Join us

खूशखबर! २०२० मध्ये प्रायवेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार एवढी पगारवाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 21:08 IST

मुंबई - आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशातील खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकलेली आहे. मात्र एकीकडे आर्थिक ...

मुंबई - आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशातील खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकलेली आहे. मात्र एकीकडे आर्थिक आघाडीवर सुस्ती असली तरी पुढील वर्षी खासगी क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  विलिस टॉवर वॉटसनच्या सॅलरी बजेट प्लॅनिंगमधील अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात वेतनामध्ये ९.९ टक्के इतकी वाढ झाली आहे. आता पुढील वर्षी ही वाढ १० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. भारतात पगारामधील सरासरी दहा टक्के वाढ ही आता एका परंपरेसारखी झाली आहे. मात्र ही वाढ आशिया-पॅसिफिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक आहे.   इंडोनेशियामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन ८ टक्के, चीनमध्ये ६.५ टक्के, फिलिपिन्समध्ये ६ टक्के, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये प्रत्येकी ४ टक्क्यांना वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विलिस टॉवर्स वॉटसन इंडियाचे मुख्य सल्लागार राजूल माथूर यांनी सांगितले की, "आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा विचार केल्यास भारतामध्ये वेतनात सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. मात्र आता कंपन्या सावध झाल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये कुठलाही मोठा बदल करण्याची त्यांची इच्छा नाही.''  या सर्वेनुसार कार्यकारी स्तरावर २०२० मध्ये वेतनात सरासरी १०.१ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी हीच वाढ ९.६ टक्के होती. व्यवस्थाकीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे वेतन १०.४ टक्क्यांनी वाढू शकते. २०१९ मध्ये ही वाढ १०.१ टक्क्यांनी नोंदवली गेली होती.  

टॅग्स :कर्मचारीभारतअर्थव्यवस्था