Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुडन्यूज! बँक अकाऊंट झिरो असतानाही 10,000 रुपये काढता येणार

गुडन्यूज! बँक अकाऊंट झिरो असतानाही 10,000 रुपये काढता येणार

जनधन योजनेतील खातेदारकांना रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात येते. त्यामुळे, आपण खात्यातून पैसेही काढू शकता आणि काही खरेदीही करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:38 PM2021-12-19T13:38:01+5:302021-12-19T13:39:05+5:30

जनधन योजनेतील खातेदारकांना रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात येते. त्यामुळे, आपण खात्यातून पैसेही काढू शकता आणि काही खरेदीही करू शकता.

Good news! 10,000 can be withdrawn even if the bank account is zero in jandhan account | गुडन्यूज! बँक अकाऊंट झिरो असतानाही 10,000 रुपये काढता येणार

गुडन्यूज! बँक अकाऊंट झिरो असतानाही 10,000 रुपये काढता येणार

Highlightsजनधन योजनेतील खातेदारकांना रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात येते. त्यामुळे, आपण खात्यातून पैसेही काढू शकता आणि काही खरेदीही करू शकता

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जनधन योजनेतून देशभरात कोट्यवधी नागरिकांनी बँकेत खाती उघडली आहेत. मात्र, अद्यापही अनेकांनी हे खातं उघडलं नाही. सध्या देशात शून्य बॅलन्सवर तब्बल 41 कोटी जनधन बँक अकाऊंट आहेत. या खात्याच्या ग्राहकांना सरकारकडून विविध सुविधा पुरविण्यात येतात. त्यानुसार, जर तुमच्या जनधन खात्यात काहीच पैसे नसतील, तरीही तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतात. 

जनधन योजनेतील खातेदारकांना रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात येते. त्यामुळे, आपण खात्यातून पैसेही काढू शकता आणि काही खरेदीही करू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली स्वातंत्र्य दिनादिवशी जनधन योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेतून 6 जानेवारी 2021 पर्यंत देशात तब्बल 41.6 कोटी नागरिकांनी बँक खातं उघडलं आहे. 

सरकारने 2018 मध्ये सुविधा आणि लाभांद्वारे या योजनेचं दुसरे चरण सुरू केले आहे. दरम्यान, मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार 2015 नंतर झिरो बॅलन्सवाल्या खात्यांमध्ये मोठी कमतरता आली आहे. मार्च 2015 मध्ये 58 टक्के खाते असे होते, ज्यामध्ये काहीच बॅलन्स नव्हता. मात्र, 6 जानेवारी 2021 मध्ये हे कमी होऊन 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच, या खात्यात आता ग्राहक पैसेही जमा करत आहेत. 

जनधन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचेही खाते खोलण्यात येते. 
या योजनेतून खाते खोलल्यास रूपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर, 30 हजार रुपयांचा लाईफ कव्हर, आणि बचत पैशांवर व्याजही मिळते. 
आपणास या खात्यांत 10 हजार रुपयांपर्यंतचे ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते.
कुठल्याही बँक खात्यामध्ये हे अकाऊंट खोलण्यात येऊ शकते. 
या खात्यासाठी आपणस कुठल्याही कमीत कमी बॅलेन्सची गरज नाही. 

Web Title: Good news! 10,000 can be withdrawn even if the bank account is zero in jandhan account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.