Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात निर्माण होणार 30 लाख नोकऱ्या 

खूशखबर! टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात निर्माण होणार 30 लाख नोकऱ्या 

टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी खूशखबर आहे. 4जी तंत्रज्ञानाची सुरुवात आणि डाटामध्ये झालेली वाढ तसेच बाजारात येत असलेल्या नवनव्या कंपन्या, डीजिटल वॉलेट्सचा वाढता वापर आणि स्मार्टफोनची वाढती लोकप्रियता यामुळे 2018 पर्यंत टेलिकॉम क्षेत्रात 30 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 06:32 PM2017-08-17T18:32:44+5:302017-08-17T19:58:05+5:30

टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी खूशखबर आहे. 4जी तंत्रज्ञानाची सुरुवात आणि डाटामध्ये झालेली वाढ तसेच बाजारात येत असलेल्या नवनव्या कंपन्या, डीजिटल वॉलेट्सचा वाढता वापर आणि स्मार्टफोनची वाढती लोकप्रियता यामुळे 2018 पर्यंत टेलिकॉम क्षेत्रात 30 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Good news! 3 million jobs will be created in telecommunications | खूशखबर! टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात निर्माण होणार 30 लाख नोकऱ्या 

खूशखबर! टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात निर्माण होणार 30 लाख नोकऱ्या 

नवी दिल्ली, दि. 17 - टेलिकॉम क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी खूशखबर आहे. 4जी तंत्रज्ञानाची सुरुवात आणि डाटामध्ये झालेली वाढ तसेच बाजारात येत असलेल्या नवनव्या कंपन्या, डीजिटल वॉलेट्सचा वाढता वापर आणि स्मार्टफोनची वाढती लोकप्रियता यामुळे 2018 पर्यंत टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात 30 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.  
असोचेम आणि केपीएमजीने केलेल्या संयुक्त अभ्यास अहवालानुसार 5जी, एम2एमचे विकसित होत असलेले तंत्रज्ञान आणि माहिती आणि जनसंपर्क तंत्रज्ञानामधील विकासामुळे 2021 पर्यंत 8 लाख 70 हजार नोकऱ्या मिळण्याची शक्यत आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील येत्या काळातील वाढती मागणी पाहता ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि त्यांच्याकडील कौशल्य पुरेसे नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. 
    त्यामुळे कौशल्याची कमतरता पूर्ण करण्याची गज आहे, असे या अहवालात म्हटले आहे. त्यासाठी इंफ्रा आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, अॅप्लिकेशन डेव्हलपर्स, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इंफ्रास्ट्रक्चर टेक्निशन, हँडसेट टेक्निशन अशा विविध प्रकारांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्याबरोबरच या क्षेत्रात सध्या काम करत असलेल्या लोकांना अपडेट करण्याची गरज आहे.  
अधिक वाचा
वस्तू आणि सेवाकरामुळे अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता
रोजगार हमीची मजुरी अडकली 'ऑनलाईन'
तुळशी अन् चंदनाच्या पानाने दिला रोजगार 

गेल्या काही वर्षामध्ये सब्सक्रायबर्स बेस प्रकारात टेलिकॉम क्षेत्राने 19.6 टक्के कम्पाउंड अॅन्युअल ग्रोथ (सीएजीआर)  दिसून आली आहे. तसेच उत्पन्नामध्ये 7.07 टक्के सीएजीआर दराने वाढ झाली आहे.  टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपले नेटवर्क अधिक आधुनिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्याबरोबरच 2017 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ऑपरेटर्सची भांडवलावरील व्यय गुंतवणूक 85 हजार 003 कोटी एवढी राहिली आहे.  
जीएसटीने दिला युवकांना रोजगार
जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू होऊन १ महिनापूर्ण झाला. या जीएसटीमुळे वाणिज्य शाखा व चार्टर्ड अकाऊंटंटच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेत प्रचंड ‘भाव’ आला आहे. ज्यांना जीएसटीचे सॉफ्टवेअर हाताळण्याचा अनुभव आहे अशांना तर नोकरीसाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जात आहे.  आकडेवारीनुसार हजारो अकाऊटंटला विविध वितरक,फर्म मध्ये काम मिळाले आहे. आणखी तेवढ्याच अकाऊंटंटची आवश्यकता असून अनुभवी युवकांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.  बहुचर्चीत व बहुप्रतिक्षीत जीएसटी करप्रणाली अखेर १ जुलैपासून देशभरात लागू झाली. एक देश एक करप्रणाली हे स्वप्न यामुळे पूर्ण झाले.  

Web Title: Good news! 3 million jobs will be created in telecommunications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.