Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

या पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार वाटप केलं जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:08 AM2018-11-26T11:08:30+5:302018-11-26T11:34:50+5:30

या पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार वाटप केलं जाणार आहे.

Good news! 65 thousand petrol pumps allotted before Lok Sabha elections | खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

Highlightsया पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार आवंटन केलं जाणार आहे.नवीन पेट्रोल पंपांच्या जागा मालकासाठी 12वीं पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली आहे.सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी याबाबतची योजना आखली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांपूर्वी देशात 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी याबाबतची योजना आखली आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नियमात बसणाऱ्यांसाठी अन् नव युवकांसाठी उद्योगाची मोठी संधी आहे. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कार्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपन्यांनी रविवारी देशभरात 55,649 पेट्रोल पंपांच्या स्थापनेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत देण्यात आलेल्या एकाही पेट्रोल पंपाचे स्थान निवडणुकांच्या राज्यातील नाही. त्यामुळे जर सध्या निवडणुका सुरू असलेल्या राज्यांचा सहभाग केल्यास या सर्व पेट्रोल पंपांची संख्या 65 हजारांवर पोहोचते. सध्या, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरम राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यातील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होताच, येथील पेट्रोल पंपांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

या पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार वाटप केलं जाणार आहे. नवीन पेट्रोल पंपांच्या जागा मालकासाठी 12वीं पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ही अट 10 वी पास अशी होती. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांत पहिल्यांदाच पेट्रोल पंपासाठी जाहिरात देण्यात आली आहे. देशात सद्यस्थितीत 63,674 पेट्रोल पंप आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पंप हे  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे आहेत. तर खासगी क्षेत्रात नायरा एनर्जी लिमिटेड कंपनीचे सर्वाधिक 4,895 पेट्रोल पंप आहेत. या कंपनीला अगोदर एस्सार आईल लिमिटेड या नावाने ओळखण्यात येत होते. तर रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड के 1,400 आणि रॉयल डच..शैल कंपनीचे 116 पेट्रोल पंप आहेत. 

या वेबसाईटवर जाऊन करता येईल अॅप्लीकेशन
https://vendor.hpcl.co.in/dealeradv4retail/index_apply.jsp

Web Title: Good news! 65 thousand petrol pumps allotted before Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.