Join us

खूशखबर... मूळ पगार ८ हजारांनी वाढणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 7:41 AM

फिटमेंट फॅक्टर वाढविण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढविला जाण्याची शक्यता आहे. ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८ हजार रुपयांवरून २६ हजार रुपयांवर जाऊ शकते.

जाणकारांनी सांगितले की, शासकीय कर्मचारी ही सरकारची मोठी व्होट बँक आहे. त्यामुळेनिवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्यास आश्चर्य वाटायला नको. या वाढीसाठी कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. २०२४ हे निवडणूक वर्ष असल्यामुळे वित्तमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. निवडणुकीनंतर नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करील. 

२.५७% वरून ३.६८%nसध्या फिटमेंट फॅक्टर २.५७% आहे. ४,२०० ग्रेड पेमध्ये मूळ वेतन १५,५०० रुपये असेल, तर १५,५०० X २.५७ या हिशेबाने वेतन ३९,८३५ रुपये होईल.nआता फिटमेंट फॅक्टर वाढवून ३.६८ केला जाऊ शकतो. त्यामुळे किमान मूळ वेतन १८ हजारांवरून २६ हजार होईल. वेतन, तसेच भत्त्यांत वाढ होईल. nमूळ वेतनात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून दीर्घकाळापासून केली जात आहे. ही मागणी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून २०२४च्या अर्थसंकल्पाद्वारे मान्य केली जाऊ शकते.

टॅग्स :व्यवसायअर्थव्यवस्था