Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:32 PM2022-03-11T22:32:39+5:302022-03-11T22:35:16+5:30

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत

Good news! Big bang for BSNL, preparation for 5G service launch with 4G in 15 august | गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

नवी दिल्ली - बीएसएनएल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड यावर्षी 15 ऑगस्ट रोजी 4 जी सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. मात्र, आाता याबाबत अपडेटेट माहिती समोर येत आहे. BSNL 4 जी सेवांसोबतच 5 जी सेवाही लाँच करणार आहे. 5 जी सेवेला सुरुवातीला Non-Standalone (NSA) मोड ने 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येईल. त्यामध्ये, विना एन्ड टू एन्ड 5 जी सर्व्हीस देण्यात येणार आहे. 

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत. यासंदर्भात ETTelecom ने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमैटिक्स (सी-डॉट) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, प्रूफ ऑफ कन्सेप्टवर (PoC) सध्या काम सुरू आहे. 

सी-डॉटचे चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, ते 5जी सेवेवरही काम करत आहेत. जिथ 5 जी एनएसए ची बाब आहे, ती बीएसएनएल ऑगस्ट 2022 पर्यंत लाँच करणार आहे. ही 4 जी प्लस 5 जी सेवा असणार आहे. त्यासाठी, एनएए कोर यंदाच्या वर्षात 15 ऑगस्टपर्यंत तयार होईल, असेही त्यांनी म्हटले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, BSNL 5G SA सेवेला पुढील वर्षात तिसऱ्या तिमाहीत जारी केलं जाऊ शकते. त्यामुळे, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 5G NSA सेवा आणि पुढील वर्षात 5G SA सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. 

दरम्यान, बीएसएनलचे अनेक प्लॅन्स हे इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि ग्राहकांना परवडणार आहेत. 

Web Title: Good news! Big bang for BSNL, preparation for 5G service launch with 4G in 15 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.