नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक बँक BoB (Bank of Baroda) ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला बँकिंगच्या कामाशी संबंधित काही अडचण किंवा गोंधळ असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेने आपल्या ग्राहकांची अडचण दूर करण्यासाठी 2 नवीन नंबर जारी केले आहेत. या नंबरद्वारे तुम्ही 24 तास सेवा घेऊ शकता. या नंबरवर फक्त मिस कॉल किंवा मेसेजद्वारे माहिती मिळेल. (bank of baroda issue number for our customers to get details reagrding your account)
विशेष म्हणजे, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असायला पाहिजे. यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 84680-01111 या क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागेल, त्यानंतर तुम्हाला खात्यातील शिल्लक (बॅलन्स) माहिती मिळेल.
– Balance Inquiry – 84680 01111
– Mini Statement – 84680 01122
– Toll Free Number 24*7 – 1800 258 44 55/1800 102 44 55
याव्यतिरिक्त तुम्ही या वेबसाईटवर https://www.bankofbaroda.in/contact-us.htm ही माहिती मिळवू शकता.
SMS सेवेचा फायदा घेऊ शकता
तुम्हाला SMS सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 84680-01122 पर BAL < space > वर BAL < space > तुमच्या बँक खात्यातील शेवटच्या 4 क्रमांकासह पाठवा. या क्रमांकावर MINI < space > आणि खात्यातील शेवटचे 4 नंबर पाठवून देखील मिनी स्टेटमेंट मिळवू शकता.
1 मार्चपासून हे बदल झाले आहेत
1 मार्च 2021 पासून विजया बँक (Vijaya Bank) किंवा देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी कोड (IFSC Code) बदलला आहे. बीओबीमध्ये विलीनीकरणानंतर, या दोन्ही बँकांचे कोड बदलले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरच आयएफएससी कोड अपडेट करा. अन्यथा ऑनलाइन व्यवहार करण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते.