Join us  

LPG Gas Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच सकाळी आनंदाची बातमी, LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता लागतील एवढे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 8:25 AM

LPG Gas Cylinder Price Today: ही कपात करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी हे सिलिंडर 1856.50 रुपयांना मिळत होते.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 जूनला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, कमर्शिअल गॅस सिलिंडर तब्बल 83 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आता 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हे सिलिंडर 1856.50 रुपयांना मिळत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीच्यात दरात मिळणार आहे.

विमान प्रवासावरही परिणाम होणार - कमर्शिअल एलपीजी स‍िलिंडरच्या बाबतीत दिल्यासा देण्या बरोबरच, तेल कंपन्यांनी जेट फ्यूअलच्या किंमतीतही कपात केली आहे. ही किंमत जवळपास 6,600 रुपयांनी कमी झाली आहे. येणाऱ्या काळात याचा परिणाम विमान प्रवासावरही होऊ शकतो. हे नवे दर 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. तसेच तेल कंपन्यांनी घरगुती LPG स‍िलिंडरच्या किंमतीत कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. 

कमर्श‍िअल गॅस स‍िलिंडरच्या नव्या किंमती -कमर्शिअल गॅस स‍िलेंडर द‍िल्‍लीत 1856.50 रुपयांवरून 1773 रुपयांवर आले आहे. कोलकात्यात ही किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आली आहे. याच प्रकारे मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडरसाठी पूर्वीच्या 1808.50 रुपयांऐवजी आता 1725 रुपये मोजावे लगातील. याशिवाय चेन्‍नईमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत आता 2021.50 रुपयांवरून  कमी होऊन 1937 रुपयांवर आली आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय