लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आपण जगभरातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत असताना भारतातही कच्च्या तेलाचे साठे आढळून येत आहेत. २०२१ मध्ये भारतात कच्च्या तेलाचा साठा अंदाजे ५९१.९२ दशलक्ष टन होता. २०२२ मध्ये त्यात वाढ होत तो ६५३.०२ दशलक्ष टन इतका झाला आहे. त्यामध्ये १० टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला असून, परदेशात जाणारा पैसा देशातच राहण्यास मदत झाली आहे.
कच्च्या तेलाचा साठा किती कुठे? २०२३ मध्ये (अंदाजे)
- पश्चिम समुद्रकिनारा - ३३.१७%
- पूर्वेकडील किनारपट्टी - ६.२९%
- आसाम - २२.७४%
- गुजरात - १७.९७%
- राजस्थान - १५.८८%
- आंध्र प्रदेश - १.७४%
- तामिळनाडू - १.३८%
- अरुणाचल प्रदेश - ०.४४%
- नागालँड - ०.३६%
- पश्चिम बंगाल - ०.०२%
- त्रिपुरा - ०.०१%
नैसर्गिक वायूचा साठा किती?
- पश्चिम समुद्रकिनारा २९.३४%
- पूर्वेकडील किनारपट्टी २३.४५%
- आंध्र प्रदेश ५.५३%
- अरुणाचल प्रदेश ०.६३%
- गुजरात ४.८३%
- आसाम १४.३७%
- नागालँड ०.०१
- राजस्थान ६.४०%
- तामिळनाडू ३.३५%
- त्रिपुरा २.६४%
- पश्चिम बंगाल ६.९०%
- झारखंड ०.३६%
- एकूण अंदाजित साठा ११४९.४६
अक्षय ऊर्जा सर्वाधिक कुठे तयार होईल?
- जम्मू काश्मीर ५.९६%
- तामिळनाडू ५.५६%
- मध्य प्रदेश ५.८४%
- तेलंगणा ३.७१%
- हिमाचल प्रदेश २.६५%
- ओडिशा १.९६%
- उत्तर प्रदेश १.५२%
- छत्तीसगड १.१३%
- उत्तराखंड १.५३%
- राजस्थान २०.३०%
- गुजरात १०.४५%
- महाराष्ट्र ११.७९%
- कर्नाटक ९.७५%
- आंध्र प्रदेश ७.९२%
- भारताचा उर्वरित भाग ८.२६%