दुबई ते भारतातीत १३ शहरांचा हवाई प्रवास स्वस्त होणार आहे. शारजाहची लो कॉस्ट कॅरिअर एअर अरबियाने भारतातील १३ शहरांसाठी ही विशेष योजना आणली आहे. या एकेरी मार्गावरील विमान भाडे हे २५० दिरहम म्हणजेच जवळपास ५ हजार रुपयांपासून सुरु होते.
खलीज टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार एअर अरबियाने दिल्ली, मुंबई, हैदराबाद. जयपूर, बंगळुरु, अहमदाबाद, गोवा, नागपूर सारख्या शहरांसाठी हे प्रवास भाडे ठरविले आहे. एअर अरबियाने रास अल खैमाह आणि शारजाह विमानतळ असे शटल बससेवा देखील सुरु केली आहे. याचे भाडे ६१० रुपये आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्येरही महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर करण्याची देखील गरज नाही.
दुबईतील ट्रॅव्हल एजंट्सनी सांगितले की, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी होम क्वारंटाईन घोषित केल्यानंतर UAE ते भारताचे विमान भाडे खूपच कमी झाले आहे. एका एजंटने सांगितले की, 'लोकांना पुन्हा फ्लाइट बंद होण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच लोक विमान प्रवास टाळत आहेत.'
काही स्थानिक UAE एअरलाईन्सच्या वेबसाइट्स देखील भारतातील प्रमुख शहरांसाठी कमी केलेले विमान भाडे दाखवत आहेत. भारतातील या प्रमुख शहरांमध्ये किमान 300 दिहराम म्हणजेच सुमारे 6 हजार प्रवास करता येतो. त्यापेक्षा हजार रुपयांनी एअर अरबियाचे विमान भाडे आहे.