मुंबई :
रशिया युक्रेन युद्धामुळे जगभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारतीय शेतकरी याला एक मोठी संधी मानत असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात सूर्यफूल, एरंडेलसह इतर तेलबियांची लागवड केली आहे. त्यामुळे सणासुदीला देशात खाद्यतेलाच्या किमती काही प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे.
देशात यंदा सूर्यफुलाची लागवड १.७७ लाख हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हीच लागवड १.४१ 5 लाख हेक्टरवर करण्यात आली होती. म्हणजेच यंदा लागवड २५ टक्क्यांनी वाढली आहे. एरंडेलची लागवडही ६८ टक्क्यांनी वाढली आहे. तेलाची निर्यात वाढली असल्याने किमती काही प्रमाणात स्थिर झाल्या आहेत.
खरीप हंगाम३४५.७ - तांदूळ -७.२%१२६.२ - कडधान्ये -५.९%१८४.१ तेलबिया-०.७५%१२४.७ कापूस ७.४%१७३.० भरड धान्य ३.६%५५.३ ऊस २.५%लागवडीचे आकडे : लाख हेक्टरमध्ये
दर का कोसळतील?अर्जेंटिना देशातून तेलाचा पुरवठा वाढला आहे. रशियाकडेही तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. तसेच भारतातही सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा फायदा होत देशात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
कोठे अधिक लागवड ?भारतात सर्वाधिक सूर्यफुलाची लागवड ही कर्नाटकमध्ये होते. या राज्यात शेतकऱ्यांनी १.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्के अधिक आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
शुद्धतेचे प्रमाण दाखवा : कंपन्यांना आदेशकेंद्र सरकारने गुरुवारी खाद्यतेल उत्पादक, पॅकेजिंग आणि आयातदारांना अनुचित व्यापार पद्धतींना आळा घालण्याच्या प्रयत्नात लेबलमध्ये तापमानाच्या ऐवजी शुद्धतेचे प्रमाण आणि वजनानुसार निव्वळ प्रमाण नमूद करण्याचे निर्देश दिले. यासाठी त्यांना १५ जानेवारी २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.