Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

EPFO News: ईपीएफओ आजवर केवळ बॉन्ड्स, सराकरी सिक्युरिटीज आणि ईटीएफमध्येच गुंतवणूक करत आले आहे. इनविट हा एक पर्यायी गुतंवणूक फंड आहे जो म्युच्युअल फंडासारखे काम करतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 02:23 PM2021-07-12T14:23:26+5:302021-07-12T14:23:55+5:30

EPFO News: ईपीएफओ आजवर केवळ बॉन्ड्स, सराकरी सिक्युरिटीज आणि ईटीएफमध्येच गुंतवणूक करत आले आहे. इनविट हा एक पर्यायी गुतंवणूक फंड आहे जो म्युच्युअल फंडासारखे काम करतो.

Good news for EPFO's account holders; EPFO to invest part of corpus in InvITs for more return: Report | EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

ईपीएफओच्या (EPFO) 6 कोटी खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. या खातेधारकांना पीएफ अकाऊंट (PF Account) वर जादा व्याज मिळण्याची शक्यता आहे. ईपीएफओ आपल्या वार्षिक जमा रकमेचा (annual deposits) एक भाग इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट्स म्हणजेच इनविट्स (InvITs) मध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. यामुळे इन्फ्रास्टक्चरमधील गुंतवणुकीला वेगच मिळणार नाही तर गुंतवणुकीचा ओघही वाढणार आहे. (invest in InvITs could help expand the scope of EPFO's investment beyond bonds.)

LIC: झोमॅटो IPO वर मोठी अपडेट; पहिल्यांदाच LIC पैसे गुंतवण्याच्या तयारीत

ईपीएफओ आजवर केवळ बॉन्ड्स, सराकरी सिक्युरिटीज आणि ईटीएफमध्येच गुंतवणूक करत आले आहे. इनविट हा एक पर्यायी गुतंवणूक फंड आहे जो म्युच्युअल फंडासारखे काम करतो. हा सेबीच्या कक्षेत येतो. मिंटने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, AIF मध्ये गुंतवणूक एक योग्य पर्याय आहे. मोठ्या इन्फ्रास्ट्रक्टर सेक्टरमध्ये दीर्घ काळाच्या फंडिंगची मागणी आहे. यामुळे ईपीएफओला परंपरागत गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा अन्यत्र गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

बजेटमध्ये सरकारने या संस्थांमधील पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतविण्याचे संकेत दिले होते. इनविट्स द्वारे हे प्रकल्प मोठ्या कालावधीसाठी पेन्शन फंडातून गुंतवणूक मिळवू शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स, एसएमई फंड्स सोशल वेंचर फंड्स AIF यावर सेबीचे नियंत्रण असते. ईपीएफओला यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आहे. इनविट्स हा सर्वात जास्त परतावा देणारा पर्याय आहे. 

इनविट्स हा खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात उपलब्ध आहे. परंतू लेव्हल १ आणि दोन मध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. सेंट्रल बोर्ड आता हा पैसा कुठे गुंतवायचा याचा निर्णय घेईल असे सेंट्रल पीएफ कमिश्नर सुनील बर्थवाल यांनी सांगितले. 

पीएफ खातेधारकांना फायदा कसा...
पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. हे व्याज ऑगसच्या अखेरीस खात्यात वळते केले जाणार आहे. जर ईपीएफओ या फंडमधलील काही हिस्सा इनविट्समध्ये गुंतवत असेल तर जास्त रिटर्न मिळणार आहे. असे झाले तर पीएफ खातेधारकांना जास्त व्याज मिळणार आहे.

Web Title: Good news for EPFO's account holders; EPFO to invest part of corpus in InvITs for more return: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.