Join us

बजेटपूर्वीच गुड न्यूज; मोबाइल स्वस्त, सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के घट; केंद्राचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 6:58 AM

Budget 2024: केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प गुुरुवारी  सादर होण्यापूर्वी बुधवारी केंद्र सरकारने मोबाइलच्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात १५ वरून १० टक्क्यांपर्यंत कपात केली. त्यामुळे मोबाइलच्या किमती ५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली -  केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प गुुरुवारी  सादर होण्यापूर्वी बुधवारी केंद्र सरकारने मोबाइलच्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात १५ वरून १० टक्क्यांपर्यंत कपात केली. त्यामुळे मोबाइलच्या किमती ५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

देशात मोबाइलचे सुटे भाग आयात केले जातात. आयात स्वस्त झाल्यामुळे उत्पादन खर्चात कपात होईल. स्मार्टफोन व बेसिक फिचर फोन अशा दोन्ही मोबाइल उत्पादनांना त्याचा लाभ होईल. सीमा शुल्क कायदा १९६२च्या कलम २५ अन्वये कर कपातीचा हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

सीतारामन मांडणार सहाव्यांदा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने सरकार  मोठ्या घोषणा टाळेल, असे म्हटले जाते, मात्र महागाईतून दिलासा, परवडणारी घरे, व्याजदरात कपात, करसवलतीच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल. 

टॅग्स :मोबाइलअर्थसंकल्प 2024