Join us

आधार कार्ड धारकांसाठी गूड न्यूज, सरकारनं Aadhaar मोफत अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 2:26 PM

सरकारनं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख १४ मार्च २०२४ होती.

Free Aadhaar Update Date Extended: सरकारनंआधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख १४ मार्च २०२४ होती, ती आता १४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना फायदा होणार आहे.  

सरकारनं सर्वसामान्यांना आणखी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. UIDAI नं यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. दस्तऐवज मोफत अपडेट करण्याची सुविधा १४ जून २०२४ पर्यंत वाढवली जात आहे. ही मोफत सेवा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. UIDAI ला लोकांनी त्यांचे आधार दस्तऐवज अपडेट करावेत अशी इच्छा आहे. 

मोफत ऑनलाइन अपडेट 

ऑनलाइन पद्धतीनंच अपडेट केल्यानंतर तुम्हाला मोफत अपडेट करुन मिळणार आहे. आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट केल्यास तुम्हाला त्यासाठी लागणारं शुल्क मात्र द्यावं लागणार आहे. 

बँक खातं उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणं, सिमकार्ड घेणं, घर खरेदी करणं इत्यादी पैशांशी संबंधित सर्व कामांसाठी आधार आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड वेळोवेळी अपडेट न केल्यास अनेक कामं रखडण्याची शक्यता आहे.  

ही माहिती करू शकता अपडेट 

तुम्ही आधार केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाइन स्वतः आधार अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती द्यावी लागेल. आधारचा बराच डेमोग्राफिक डेटा स्वतःहून ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो. परंतु अशा अनेक गोष्टी देखील आहेत, त्यासाठी तुम्हाला फक्त आधार केंद्रावर जावं लागेल. उदाहरणार्थ,  Iris किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावं लागेल.

टॅग्स :आधार कार्डसरकार