टेलिकॉम सेक्टरमधील एअरटेल आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या दोन्ही कंपन्यांना सरकार लिलावाशिवाय स्पेक्ट्रम वाटप करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार भारती एअरटेल आणि व्होडाफोन, आयडिया या दोन कंपन्यांना लिलावाशिवाय स्पेक्ट्रम वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांचे परवाने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संपत आहेत. सरकारला सध्या स्पेक्ट्रमचा लिलाव करणे शक्य नाही. त्यामुळे सरकार लिलाव न करता या दोन्ही कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप करेल, असं सांगण्यात येत आहे.
मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा अवलिया ; निवृत्तीनंतर उभी केली कोट्यवधींची कंपनी
भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या कंपन्यांना लिलावाशिवाय स्पेक्ट्रम मिळेल. दोन्ही कंपन्यांचे ६ स्पेक्ट्रम परवाने फेब्रुवारी, मार्चमध्ये संपत आहेत. जम्मू आणि काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, पश्चिम बंगालचा परवाना फेब्रुवारी-मार्च दरम्यान संपेल.
'स्पेक्ट्रमचा लिलाव करणे शक्य नाही'
स्पेक्ट्रम लिलावासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी लागतो. भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे परवाने फेब्रुवारी-मार्चमध्ये संपत असल्याने आता फारसा वेळ शिल्लक नाही. त्यामुळे सध्या स्पेक्ट्रमचा लिलाव करणे शक्य नाही. त्यामुळे सरकार या दोन्ही कंपन्यांना लिलाव न करता स्पेक्ट्रमचे वाटप करणार असल्याचे बोलले जात आहे.
कंपन्यांना राखीव किमतीवर स्पेक्ट्रम विकत घ्यावे लागतील. या स्पेक्ट्रमचा लिलाव मार्चच्या अखेरीस होणे अपेक्षित आहे. लिलावानंतर स्पेक्ट्रमची संपूर्ण किंमत कंपन्यांना द्यावी लागेल.