Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर, ६ महिन्यांपर्यंत मिळणार १३००GB हाय स्पीड डेटा, किंमत केवळ 'इतकी'

BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर, ६ महिन्यांपर्यंत मिळणार १३००GB हाय स्पीड डेटा, किंमत केवळ 'इतकी'

Bsnl News : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या अधिकाधिक युजर्सला आपल्यासोबत जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल एकापाठोपाठ एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:40 IST2024-12-13T15:40:08+5:302024-12-13T15:40:08+5:30

Bsnl News : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या अधिकाधिक युजर्सला आपल्यासोबत जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल एकापाठोपाठ एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.

Good news for BSNL customers 1300GB high speed data will be available for 6 months price is only 1999 rs | BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर, ६ महिन्यांपर्यंत मिळणार १३००GB हाय स्पीड डेटा, किंमत केवळ 'इतकी'

BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर, ६ महिन्यांपर्यंत मिळणार १३००GB हाय स्पीड डेटा, किंमत केवळ 'इतकी'

Bsnl News : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या अधिकाधिक युजर्सला आपल्यासोबत जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. अधिकाधिक लोक बीएसएनएलकडे आकर्षित व्हावेत यासाठी बीएसएनएल एकापाठोपाठ एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे. रिचार्ज प्लॅनसोबतच बीएसएनएल नवीन सेवाही लाँच करत आहे. आता बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी विंटर बोनांझा ऑफर आणली आहे. 

कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे यासंदर्भातील माहिती दिलीये. विंटर बोनांझा ऑफरमध्ये बीएसएनएल आपल्या युजर्सना केवळ १९९९ रुपयांमध्ये ६ महिन्यांसाठी भारत फायबर ब्रॉडबँड सेवा देत आहे.

६ महिन्यांपर्यंत हाय स्पीड डेटा

बीएसएनएलच्या विंटर बोनांझा ऑफरअंतर्गत बीएसएनएल युजर्संना केवळ १९९९ रुपयांत ६ महिन्यांपर्यंत हायस्पीड डेटाचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये युजर्सला २५ एमबीपीएसच्या स्पीडनं दरमहा १३०० जीबी डेटा दिला जात आहे. इतकंच नाही तर डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ४ एमबीपीएसच्या स्पीडनं अनलिमिटेड इंटरनेटचाही फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्स लँडलाइनच्या माध्यमातून अनलिमिटेड कॉलिंगचा ही फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व टेलिकॉम सर्कलसाठी आहे. यात दिल्ली आणि मुंबईतील युजर्सचा समावेश नाही.

बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी ५९९ रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांची वैधता मिळेल, ज्यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतील. दरम्यान, बीएसएनएल सध्या ४जी नेटवर्कवरही काम करत आहे. लवकरच देशभरात बीएसएनएलचे फोरजी नेटवर्क सुरू होणार आहे.

Web Title: Good news for BSNL customers 1300GB high speed data will be available for 6 months price is only 1999 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.