BSNL Recharge Plan : गेल्या काही दिवसांत लाखो लोक सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलसोबत जोडले गेले आहेत. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यामुळेच बहुतांश लोक आपला नंबर बीएसएनएलवर पोर्ट करत आहेत. जर तुम्ही बीएसएनएल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दररोज फक्त ६ रुपयांमध्ये अनलिमिटेड सेवेचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या प्लॅनबद्दल.
बीएसएनएलचा हा प्लॅन २३९९ रुपयांचा आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड सर्व्हिस देत आहे. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या २३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते बेनिफिट्स आहेत.
बीएसएनएलचा २३९९ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा २३९९ रुपयांचा प्लॅन ३९५ दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला १ वर्षापेक्षा जास्त काळ पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. २३९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ३९५ दिवसांच्या वैधतेनुसार तुमचा दैनंदिन खर्च ६ रुपयांच्या आसपास असेल. यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल.
हा प्लॅनही बेस्ट
जर तुम्ही बीएसएनएलचा लाँग व्हॅलिडिटी प्लॅन शोधत असाल तर तुम्ही बीएसएनएलचा ७९९ रुपयांचा प्लॅन पाहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळते म्हणजेच तुम्ही तुमचे बीएसएनएल सिम पूर्ण १ वर्ष अॅक्टिव्ह ठेवू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला पहिल्या ६० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.