गेल्या काही दिवसापासून सोन्या(Gold), चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता पुन्हा यावर्षीच्या दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. पण असं काही झालेले नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
दिवाळीच्या काही दिवस अगोदरच सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. आज शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजीही भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मंदी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव ०.२२ टक्क्यांनी घसरला आहे. तर एमसीएक्सवर आज चांदीचा दर ०.४७ टक्क्यांनी घसरला आहे.
खेड्यांत रोजगार वाढला; वाहन विक्रीही सुसाट!
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज किमती ०.०८ टक्क्यांनी घसरून १,६२६.२५ डॉलर प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ झाली असून, चांदीची किंमत १.११ टक्क्यांनी वाढून आज १८.६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
एक दिवस आधी गुरुवारीही भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर ५०,५१६ रुपयांपर्यंत होते. एक किलो चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली असून चांदी ५६,४५१ रुपये प्रति किलो दर आहे. गुरुवारी सोन्याचे दर ६६ रुपयांनी घसरून ५०,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी यावर्षीचा दिवाळी गोडवा आणणारी आहे. (Latest Gold Rate)