Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! स्मार्टफोन, टीव्हीसह होम अप्लायन्सेस झाली स्वस्त; पाहा संपूर्ण यादी, सरकारकडून दिलासा

खूशखबर! स्मार्टफोन, टीव्हीसह होम अप्लायन्सेस झाली स्वस्त; पाहा संपूर्ण यादी, सरकारकडून दिलासा

स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आजपासून स्वस्त झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:36 PM2023-07-01T12:36:29+5:302023-07-01T12:37:34+5:30

स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आजपासून स्वस्त झाल्या आहेत.

Good news for buyers Home appliances including smartphones TV fridge have become cheaper see the complete list know details | खूशखबर! स्मार्टफोन, टीव्हीसह होम अप्लायन्सेस झाली स्वस्त; पाहा संपूर्ण यादी, सरकारकडून दिलासा

खूशखबर! स्मार्टफोन, टीव्हीसह होम अप्लायन्सेस झाली स्वस्त; पाहा संपूर्ण यादी, सरकारकडून दिलासा

Smartphones, TVs, Home Appliances Become Cheaper: स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आजपासून स्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, सरकारनं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवरील जीएसटी कमी केला आहे. आता या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ३१.१ टक्के जीएसटी भरावा लागणार नाही. सरकारनं या सर्व उत्पादनांवरील जीएसटी जवळपास निम्म्यावर आणला आहे. म्हणजेच ही सर्व उत्पादने पूर्वीपेक्षा खरेदी करणं तुमच्यासाठी अधिक किफायतशीर ठरणार आहे.

वॉशिंग मशिन, मोबाईल फोन, रेफ्रिजरेटर, होम अप्लायन्सेस, यूपीएस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटी कमी करून सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला  आहे. आतापर्यंत या सर्व गोष्टींवर ३१.३ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जात होता. पण आता तो १२ ते १८ टक्क्यांपर्यंत आकारला जाईल. अर्थ मंत्रालयानं ट्विटरद्वारे घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर जीएसटी सूट दिल्याची माहिती शेअर केली आहे. यामुळे आता या वस्तू स्वस्त होणार आहेत. नवीन जीएसटी दरामुळे काय स्वस्त होईल ते पाहू.

टीव्ही खरेदी करणं स्वस्त
सरकारनं २७ इंच किंवा त्याहून कमी इंचाच्या स्क्रीनसाठी टीव्हीवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्के कमी केला आहे. बहुतांश ग्राहकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. कारण बहुतेक स्मार्ट टीव्हीचा स्क्रीन आकार ३२ इंच किंवा त्याहून अधिक आहे. त्यावर ३१.३ टक्के जीएसटी लागू होतो. त्यामुळे, जर तुम्हाला लहान टीव्ही हवा असेल तर तुम्ही काही पैसे वाचवू शकता. पण जर तुम्हाला मोठा टीव्ही हवा असेल तर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच जीएसटी भरावा लागेल.

मोबाइल होणार स्वस्त
सरकारनं मोबाईल फोनवरील जीएसटी कमी केल्यानं ते आता स्वस्त होणार आहेत. यापूर्वी मोबाईल फोन खरेदी करताना ग्राहकाला ३१.३ टक्के जीएसटी भरावा लागत होता. ती आता १२ टक्क्यांवर आणण्यात आलाय. ज्यामुळे मोबाईल फोन कंपन्यांना त्यांच्या फोनच्या किमतीत कपात करता येणार आहे.

होम अप्लायन्सेस स्वस्त
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन तसेच पंखे, कुलर, गिझर इत्यादी गृहोपयोगी वस्तूही स्वस्त होतील. या गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मिक्सर, ज्युसर, व्हॅक्यूम क्लीनर, एलईडी, व्हॅक्यूम फ्लास्क आणि व्हॅक्यूम भांडी यांसारख्या इतर घरगुती उपकरणांवरही जीएसटी कमी करण्यात आला आहे. मिक्सर, ज्युसर इत्यादींवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे. तर एलईडीवरील जीएसटी १५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आला आहे.

Web Title: Good news for buyers Home appliances including smartphones TV fridge have become cheaper see the complete list know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.