नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. तर अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. यातच महागाई गगनाला भिडली आहे. या पार्श्वभूमिवर आता कर्माचाऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये पगारात दुप्पटीने वाढ होऊ शकते.येणाऱ्या इंक्रीमेंटमध्ये १०.४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
२०२२ मध्येही कंपन्यांनी १०.६ टक्क्यांनी वाढ केली होती. वर्ष २०१६ नंतर असं पहिल्यांदा होत आहे. सलग दोन वर्ष कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ होऊ शकते.
Aadhar Update: आता आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये होणार मोठे बदल; वाचा सविस्तर
एऑन इंडियाच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २०.३ टक्के आहे. २०२१ मध्ये ही संख्या २१ टक्के होती. तरीही ही संख्या दोन दशकातीस जास्त आहे. आता इकॉनॉमी पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पगारात वाढ मोठ्या प्रमाणत होऊ शकते. २०२३ मध्ये १०.४ टक्क्यांनी पगारवाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
या क्षेत्रात पगार मोठ्या प्रमाणात वाढणार
या अहवालामध्ये १३०० कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातील ४६ टक्के कंपन्यांनी २०२३ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. २०२२ मध्ये ४२ टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ केली होती.
२०२२ आणि २०२३ मध्ये कंपन्यांनी पगारात ५ ते ८ टक्क्यांनी वाढवून आठ टक्के केली.यापेक्षा जास्त करण्यात येत आहे. याचे कारम म्हणजे टॅलेंटेड स्टाफची वाढती मागणी. २०२० मध्ये पगारात ६.१ एवढे एव्हरेज आणि २०२१ मध्ये ९.१ टक्के राहिले आहे, असंही या अहवालात म्हटले आहे.
अनिल अंबानींना तूर्तास दिलासा,१७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई नको, न्यायालयाचे निर्देश
ई- कॉमर्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पगारवाढ होऊ शकते. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात १३.७ टक्क्यांनी वाढ झाली. २०२३ मध्ये या क्षेत्रात १२.८ टक्क्यांनी इंक्रीमेंट होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात १२.१ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.तर आयटी क्षेत्रात २०२२ मध्ये कंपन्यांनी १२ टक्क्यांनी इंक्रीमेंट केली होती. २०२३ मध्ये या कंपन्या ११.३ टक्क्यांनी इंक्रीमेंट करणार असल्याचा अंदाज आहे. आर्थिक क्षेत्रात १०.५ टक्के आणि आयटीईएस क्षेत्रात १०.१ टक्क्यांनी इंक्रीमेंट होऊ शकते, असंही या अहवालात म्हटले आहे.