Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा होणार भरघोस पगारवाढ; रिपोर्टमधून खुलासा

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा होणार भरघोस पगारवाढ; रिपोर्टमधून खुलासा

इंटरनॅशनल स्पेशलिस्ट रिक्रूटमेंट ग्रुप मायकेल पेज इंडियाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:39 PM2022-04-06T21:39:38+5:302022-04-06T21:43:44+5:30

इंटरनॅशनल स्पेशलिस्ट रिक्रूटमेंट ग्रुप मायकेल पेज इंडियाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Good news for employees! There will be huge salary increase this year; Disclosure from the report | कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा होणार भरघोस पगारवाढ; रिपोर्टमधून खुलासा

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा होणार भरघोस पगारवाढ; रिपोर्टमधून खुलासा

कोरोना महामारीच्या २ वर्ष संकटानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रही आता बऱ्यापैकी रुळावर आले आहे. त्यामुळे यंदा कंपन्या कर्मचाऱ्यांना इंक्रीमेंट देण्याचं प्लॅनिंग करत होते. रिपोर्टनुसार, या वर्षी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या नफ्यामुळे यावेळी कंपन्या कर्मचाऱ्यांना सरासरी ९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी दिलेल्या ७ टक्के सरासरी वाढीपेक्षा ही २ टक्के अधिक आहे. स्टार्टअप्स, न्यू एज कॉर्पोरेशन्स आणि युनिकॉर्न्समध्ये, कर्मचाऱ्यांनाही यावर्षी बंपर पगारवाढ मिळू शकते. त्यांना सरासरी १२ टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल स्पेशलिस्ट रिक्रूटमेंट ग्रुप मायकेल पेज इंडियाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, कंपन्यांमधील चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावर्षी २०-२५ टक्के किंवा त्याहून अधिक पगारवाढीची अपेक्षा आहे.

अहवालानुसार, बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योग, मालमत्ता-बांधकाम क्षेत्रात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनाही यावर्षी चांगली पगारवाढ मिळू शकते. संगणक विज्ञान क्षेत्रात वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या व्यावसायिकांना हे वर्ष सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. त्यांना त्यांच्या संबंधित कंपनीत चांगली पगारवाढ मिळू शकते. याचे कारण म्हणजे भारतातील ई-कॉमर्सचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे आणि सर्व क्षेत्रे त्यांच्या व्यवसायाचे डिजिटल परिवर्तन करण्यात गुंतलेले आहेत.

व्यवसाय क्षेत्रातील मूड सकारात्मक

मायकल पेज इंडियाचे व्यवस्थापकिय संचालक अंकित अग्रवाल म्हणाले, "एकंदरीत कॉर्पोरेट क्षेत्राचा मूड यावेळी सकारात्मक आहे. महामारी आता मागे राहिली आहे अशी सर्वसाधारण भावना आहे. बाजारपेठेतील वाढत्या नोकऱ्यांच्या संधी, टॅलेंटचा अभाव आणि कंपन्यांमध्ये चांगले कर्मचारी नेमण्याची वाढती इच्छा यामुळे पगार जास्त मिळत आहेत.

त्यांनी सांगितले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे ८.३ टक्के दराने वाढली आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी, अर्थव्यवस्था ८.७ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात जास्तीत जास्त वाढ अपेक्षित आहे. डेटा सायंटिस्ट, वेब डेव्हलपर आणि क्लाउड आर्किटेक्ट यांना जास्त मागणी असेल.

Web Title: Good news for employees! There will be huge salary increase this year; Disclosure from the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.