Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट

गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट

गेल्या दीड महिन्याचा विचार करता, सोन्याचा दर 3500 रुपयांच्या जवळपास घसरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:33 PM2023-06-23T14:33:16+5:302023-06-23T14:33:38+5:30

गेल्या दीड महिन्याचा विचार करता, सोन्याचा दर 3500 रुपयांच्या जवळपास घसरला आहे.

Good news for gold buyers, gold and silver prices are falling every day Check the latest rate | गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट

गोल्‍ड खरेदीदारांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात रोज होतेय घसरण! चेक करा लेटेस्ट रेट

आपण सोने अथवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या सहा दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात जवळपास 300 रुपयांची घसरण झाली. एवढेच नाही, तर गेल्या दीड महिन्यात चांदीच्या दरातही 9000 रुपये प्रत‍ि क‍िलोची घसरण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 61,000 रुपयांपेक्षा वर पोहोचला होता. याच पद्धतीने चांदीही 77,000 हजार रुपयांच्या वर गेली होती. मात्र आता दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण दिसत आहे.

सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण - 
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी, अर्थात शुक्रवारी मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेन्ज (MCX) आणि सराफा बाजार दोन्हींतही सुस्ती दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्याचा विचार करता, सोन्याचा दर 3500 रुपयांच्या जवळपास घसरला आहे. चांदीही 68,000 रुपयांवर आली आहे. यात 9000 रुपयांपेक्षाही अधिकची घसरण दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत तेजीने वाढणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमती तेजीनेच खालीही येत आहेत.

MCX वर सोन्या-चांदीच्या दरात घसरण - 
मल्टी-कमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. MCX वर शुक्रवारी सोन्याचा दर 63 रुपयांनी घसरून 58123 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम आणि चांदी 313 रुपयांनी घसरून 67995 रुपये प्रत‍ि क‍िलोवर ट्रेंड करत आहे. यापूर्वी गुरूवारी एमसीएक्‍सवर सोने 58196 रुपये, तर चांदी 68308 रुपये प्रति क‍िलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारातही घसरण सुरूच - 
सराफा बाजारातील किंमतीतही शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. सराफातील किंमतीसाठी अधिकृत वेबसाइट https://ibjarates.com नुसार 24 कॅरेट सोने जवळपास 300 रुपयांनी घसरून 58380 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर, तर 999 दर्जाची चांदी जवळपास 800 रुपयांनी घसरून 68194 रुपये प्रत‍ि किलोवर दिसून आली. वेबसाइटवरील जारी रेट शिवाय, जीएसटी आणि मेक‍िंग चार्ज देखील द्यावा लागतो. यापूर्वी गुरुवारी चांदी 69009 रुपये प्रत‍ि क‍िलो तर सोने 58654 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

 

Web Title: Good news for gold buyers, gold and silver prices are falling every day Check the latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.