Join us  

Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, किंमतीत झाली मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 11:29 PM

HDFC सिक्युरिटीजने आजच्या सोन्याच्या किमतीची माहिती दिली आहे...

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Price Today) आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचा दर 59,000 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय चांदीच्या किंमतीतही मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. HDFC सिक्युरिटीजने आजच्या सोन्याच्या किमतीची माहिती दिली आहे.

सोनं स्वस्त चांदी महाग - दिल्ली सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचा भाव 180 रुपयांनी घसरून 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 59,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव 240 रुपयांनी वाढून 72,140 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 

ग्लोबल मार्केटमध्ये काय आहे भाव? -याशिवाय, ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचा दरात तेजी दिसून आली आहे. येथे सोन्याचा दर 1,982 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तसेच, चांदीच्या दरात वाढ होऊन ती 24.04 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

'24 कॅरेट गोल्ड होता असते सर्वात शुद्ध -खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

 

टॅग्स :सोनंचांदीबाजारगुंतवणूक