विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर आज सोन्याचा दर घसरला आहे. याशिवाय आज चांदीही स्वस्त झाली आहे. आज सराफा बाजारातही आकाशाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर कोसळले आहेत.
एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 875 रुपयांनी घसरून 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भावही 760 रुपयांनी घसरून 76,990 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. चांदीचा यापर्वीचा दर 77,750 रुपये प्रति किलो होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे दिलीप परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याची स्पॉट प्राइस 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. अर्थात सोने गेल्या दिवसाच्या तुलनेत 875 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच शुक्रवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 282 रुपयांनी घसरून 65,907 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 282 रुपयांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरून 65,907 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ज्यात 9,723 लॉटचा बिझनेस झाला.
चांदी - चांदीचा दर आज 531 रुपयांनी घसरून 75,550 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मे डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 531 रुपये किंवा 0.71 टक्क्यांनी घसरून 75,550 रुपये प्रति किलोवर आला आणि ज्यात 25,948 लॉटचा बिझनेस झाला.