मुंबई: खासगी क्षेत्रातील अव्वल बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. बँकेनं मुदत ठेवीवरील व्याजाचा दर वाढवला आहे. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, २ कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याज दर ५-१० बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आले आहेत. १४ फेब्रुवारीपासून नवे दर लागू झाले आहेत.
एचडीएफसी बँक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीची सुविधा देते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याजदेखील देते. ७ ते १० वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर २.५० टक्के ते ५.६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर मिळणारा व्याज दर ३ टक्के ते ६.३५ टक्क्यांदरम्यान आहे.
अवधी व्याज दर वरिष्ठ नागरिकांसाठी व्याज दर
7-14 दिवस 2.50% 3.00%15-29 दिवस 2.50% 3.00%30-45 दिवस 3.00% 3.50%46-60 दिवस 3.00% 3.50%61-90 दिवस 3.00% 3.50%91 दिवस से 6 महिने 3.50% 4.00%6 महिने 1 दिवस - 9 महिने 4.40% 4.90%9 महिने 1 दिवस - 1 वर्षापेक्षा कमी 4.40% 4.90%1 वर्ष 5. 0% 5.50%1 वर्ष 1 दिवस - 2 वर्ष 5.00% 5.50%2 वर्ष 1 दिवस - 3 वर्ष 5.20% 5.70%3 वर्ष 1 दिवस - 5 वर्ष 5.45% 5.90%5 वर्ष 1 दिवस - 10 वर्ष 5.60% 6.35%
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनंदेखील २ वर्षांहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात १०-१५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानुसार ७ ते १० वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर २.९ टक्के ते ५.५ टक्क्यांच्या दरम्यान असेल. ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉईंट अतिरिक्त मिळतील. १५ फेब्रुवारी २०२२ पासून हे दर लागू होतील.