Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC Bank: अर्थसंकल्पानंतर HDFC बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; FD वर 20 bps वाढ, 7.9 टक्के परतावा मिळणार

HDFC Bank: अर्थसंकल्पानंतर HDFC बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; FD वर 20 bps वाढ, 7.9 टक्के परतावा मिळणार

HDFC Bank: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारमन यांनी मोठ्या घोषणा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:00 PM2024-07-24T15:00:39+5:302024-07-24T15:06:57+5:30

HDFC Bank: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारमन यांनी मोठ्या घोषणा केल्या.

Good news for HDFC Bank customers after Budget 20 bps increase on FD, returns 7.9 percent | HDFC Bank: अर्थसंकल्पानंतर HDFC बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; FD वर 20 bps वाढ, 7.9 टक्के परतावा मिळणार

HDFC Bank: अर्थसंकल्पानंतर HDFC बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; FD वर 20 bps वाढ, 7.9 टक्के परतावा मिळणार

एचडीएफसी (HDFC) बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एफडीवरील व्याजदरात मोठा बदल केला आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात २० आधार अंकांची वाढ केली आहे. त्यानंतर बँक ४ वर्षे आणि ७ महिन्यांत म्हणजेच ५५ महिन्यांच्या मुदतीच्या FD वर ७.४० टक्के व्याज दर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९० टक्के मोठा परतावा देत आहे. ह नवीव दर आजपासून लागू झाले आहेत.

Gold Silver Price: टॅक्स कपात केल्यानंतर सोनं ४ हजार रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२९९ ने घसरली

एचडीएफसी बँक ७ ते २९ दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना ३% व्याज दर देत आहे. ३० ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या FD वर ३.५०% व्याज दिले जात आहे, तर ४६ दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ४.५०% व्याज देत आहे.

बँक सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि नऊ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ५.७५% व्याजदर देते. बँक नऊ महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ६% व्याज दर देत आहे.

एक वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर ६.६०% व्याजदर मिळेल, तर १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD ला ७.१०% परतावा मिळेल. बँक एफडीवर ७.२५% व्याज देते ज्यांचा परिपक्वता कालावधी १८ महिने ते २१ महिन्यांपेक्षा कमी आहे. HDFC बँक २१ महिने ते दोन वर्षे आणि अकरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७% व्याज दर देते.

सोनं ४ हजार रुपयांनी झालं स्वस्त

काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी सोनं आणि चांदीवरील टॅक्स कपातीची घोषणा केली. यामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.आज बुधवारी म्हणजेच अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आला आहे. तर, चांदी ८४८९७ रुपये प्रति किलो दराने उघडली. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एका झटक्यात सराफा बाजारात सोने ३६१६ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदी ३२७७ रुपये प्रतिकिलो दराने घसरली.आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४०८ रुपयांनी घसरून ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २३ कॅरेट सोन्याचे दरही ४०६ रुपयांनी घसरून ६८९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

Web Title: Good news for HDFC Bank customers after Budget 20 bps increase on FD, returns 7.9 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.