Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण

घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण

सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय नागरिकांचं आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:51 PM2022-05-19T13:51:10+5:302022-05-19T13:52:10+5:30

सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय नागरिकांचं आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होतं.

Good news for home builders, big drop in construction steel prices of market | घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण

घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण

मुंबई - लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. कारण, लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वप्न सत्यात उतरवणे असंच असते. त्यामुळेच, घर बांधताना सध्या बाजार भावात बांधकाम वस्तूंची, साहित्यांची किंमत किती आहे. या वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊन माणूस घर बांधायला सुरुवात करतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बांधकामासाठी लागलेल्या स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय नागरिकांचं आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होतं. कारण, मुलांची लग्न आणि घराचं बांधकाम हेच काय ते आयुष्याचं गणित असंत. म्हणून, घर बांधताना माणूस स्वस्त-महाग या बाबींचा विचार करतो. मात्र, युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थिती गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागलं होतं. बांधकाम स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किंमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती. 

मार्च महिन्यात बांधकाम स्टील म्हणजे सळयांची किंमत जवळपास 70 हजार रुपये प्रति टन म्हणजे 70 रुपये किलो होती. मात्र, मे महिन्यात या किंमतीत घट झाली असून एप्रिल महिन्यात 76 रुपये किलो असलेलं स्टील आता मे महिन्यात 61,525 रुपये टनांवर पोहोचले आहे. म्हणजेच, बाजारात 61-62 रुपये किलो दर आहेत. स्टील विक्रेते युसूफ लोखंडवाला यांनी सांगितले की, यापूर्वी लोखंडाच्या किंमतीत दिवसाला 100 ते 200 रुपयांची वाढ होत होती. आता, एक दिवसात 1000 ते 2000 रुपयांची चढ-उतार होत आहे. गेल्या काही दिवसांत 3000 रुपयांनी दर कमी झाले होते. मे आणि जून महिन्यात सर्वाधिक लोखंड विकले जाते. मात्र, कोरोना आणि तेजीमंदीमुळे लोखंड विक्रीच्या व्यवसायात यंदा 40 टक्केच खरेदी दिसून आली. 

दरम्यान, बाजार भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांची कोंडी होत आहे. कारण, व्यापारी कंपनीकडून चढ्या दराने माल मागवतात. मात्र, गाडी दारात पोहोचेपर्यंत दर पुन्हा कमी झालेले असता. याचा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल स्टॉक करणे बंद केल्याचे लोखंडवाला यांनी सांगितले. दरम्यान, सध्या स्टीलचे भाव कमी झाल्याने घर बांधकाम करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे. 

Web Title: Good news for home builders, big drop in construction steel prices of market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.