Join us

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! डेबिट कार्डप्रमाणेच ट्रेडिंग खाते ब्लॉक करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 1:06 PM

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने आंनदाची बातमी दिली आहे.

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी सेबीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजार नियामक सेबीने देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना नवीन सुविधा देण्यासाठी एक योजना तयार केली आहे. तुमच्या डिमॅट खात्यामध्ये काही संशयास्पद काही वाटले तर तुम्ही ते डेबिट कार्डप्रमाणे लगेच ब्लॉक करू शकता. सेबीने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सर्व शेअर ब्रोकर्सना सूचना देण्यात आल्या आहेत. 

सातत्यानं होतेय शेअरच्या किंमतीत वाढ, अयोध्येशीही जोडलं गेलंय कंपनीचं नाव; गुंतवणूकदार मालामाल

सध्या देशात १२.९७ कोटी डिमॅट खाती आहेत. सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये ऑनलाइन ब्लॉकिंग सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक त्यांच्या नेटबँकिंग किंवा अॅपद्वारे ते ब्लॉक करू शकतात. आता सेबी गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यांवर अशीच सुविधा देणार आहे. कोणतीही तफावत आढळल्यास, ग्राहक त्यांचे डीमॅट खाते ऑनलाइन ब्लॉक करू शकतील.

खाते ब्लॉक करता येणार

बाजार नियामक सेबीने ब्रोकरेज कंपन्यांना गुंतवणूकदारांना त्यांची ट्रेडिंग खाती स्वेच्छेने गोठवण्याची किंवा ब्लॉक करण्याची परवानगी देण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यास सांगितले आहे. सध्या गुंतवणूकदारांना त्यांच्या डीमॅट खात्यांमधील व्यवहार गोठवण्याचा किंवा ब्लॉक करण्याचा पर्याय आहे, पण ट्रेडिंग खात्यांमध्ये नाही. बाजारातील सहभागींनी सांगितले की डिमॅटचा पर्याय उपलब्ध असला तरी माहितीच्या अभावामुळे गुंतवणूकदार त्याचा फारसा वापर करत नाहीत. SEBI चे हे पाऊल 'Ease of Investing by Investors' उपक्रमांतर्गत आहे. गुंतवणुकदारांद्वारे संशयास्पद कीहू दिसल्यास खाती गोठवण्याची/ब्लॉक करण्याची सुविधा सध्या बहुतांश ब्रोकर्सकडे उपलब्ध नाही.

सेबीने म्हटले आहे की, ब्रोकर्सना खाती गोठवण्याची आणि ब्लॉक करण्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर कारवाई कशी करावी याबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे असावीत. सर्व ब्रोकर्सनी त्यांच्या ग्राहकांना या सुविधेबद्दल माहिती द्यावी असं सेबीने म्हटले आहे. 

'कधीकधी गुंतवणूकदार त्यांच्या ट्रेडिंग खात्यांमध्ये संशयास्पद काही दिसल्यास ट्रेडिंग खाती ब्लॉक करणे सुलभ करण्याच्या परिस्थितीकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे, कारण हे एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासारखे आहे. SEBI ने सांगितले १ जुलै रोजी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, स्टॉक एक्स्चेंजना त्यांच्या सुविधांबद्दल अनुपालन अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत नियामकाकडे सादर करावा लागेल.

टॅग्स :सेबीव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार