Join us  

मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:33 PM

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये १० ऑगस्टपर्यंत डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वार्षिक आधारावर १५.७३ टक्के वाढून ६.५३ लाख कोटी रुपये एवढं झालं आहे. सरकारने सांगितले की, १ एप्रिल २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण ६९ हजार कोटींचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम गेल्या आर्थिक देण्यात आलेल्या परताव्यापेक्षा ३.७३ टक्के अधिक आहे. 

प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी सांगितले की, परतावा समायोजित करण्यात आल्यानंतर निव्वळ डायरेक्ट टॅक्स कलेक्शन हे ५.८४ लाख कोटी रुपये एवढं राहिलं आहे. ही रक्कम गेल्या वर्षात याच काळात जमा झालेल्या रकमेपेक्षा १७.३३ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने सांगितले की, डायरेक्ट टॅक्स कलेक्शनचा १० ऑगस्टपर्यंतचा तात्पुरता आकडा हा कर संग्रहामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दर्शवत आहे. 

टॅक्स कलेक्शन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संग्रहाच्या अंदाजापेक्षा ३२.०३ टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये १० ऑगस्टपर्यंत  ६९ हजार कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच काळातील रकमेपेक्षा ३.७३ टक्के अधिक आहे. याआधी जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या आकड्यांमध्ये सांगण्यात आले होते की,  चालू आर्थिक वर्षामध्ये ९ जुलैपर्यंत प्रत्यक्ष करसंग्रह १५ टक्क्यांनी वाढून ५.१७ लाख कोटी रुपये झाला आहे. अशा प्रकारे एका महिन्यामध्ये सरकारने १.३६ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रत्यक्ष कर गोळा केला आहे.  

टॅग्स :करपैसाकेंद्र सरकार