महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मान्यता दिलेल्या एमटीआर फ्रेमवर्कवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग्याच्या सुधारित टॅरिफ शेड्युलला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी टाटा पॉवरनं केली होती. दरम्यान, टाटा पॉवरनं केलेली विनंती अपीलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीनं (एपीटीईएल) एका आदेशाद्वारे मान्य केली आहे.
या आदेशामुळे टाटा पॉवरच्या ग्राहकांचा फायदा होणार आहे. या आदेशामुळे मिळालेला दिलासा कंपनीला आपल्या ७.५ लाख ग्राहकांना देता येईल. तसंच मुंबईतील टाटा पॉवरच्या ग्राहकांचा या आदेशामुळे फायदा होणार आहे. टाटा पॉवरनं एपीटीईएलकडे एमईआरसीने ३० मार्च २०२३ रोजी जारी केलेल्या टॅरिफ आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली होती. दरम्या, या निर्णयामुळे ग्राहकांच्या वीज बिलाच वाढ झाली असती.
"ही अंतरिम स्थगिती मुंबईतील लोकांना परवडण्याजोगी वीज पुरवण्यासाठी टाटा पॉवर अतिशय निष्ठापूर्वक करत असलेले प्रयत्न दर्शवत आहे. पर्यावरणपूरक वीज स्वस्त दरांमध्ये पुरवण्याची आमची बांधिलकी यामुळे सिद्ध झाली आहे आणि या निर्णयाचा थेट लाभ आमच्या ग्राहकांना मिळणार आहेत. एपीटीईएलच्या आदेशामुळे मिळालेला दिलासा आमच्या ७.५ लाख ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल," अशी प्रतिक्रिया टाटा पॉवरचे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे प्रेसिडेंट संजय बांगा यांनी दिली.
कंपनीने एमईआरसीकडे ३१ मार्च २०२० रोजी प्रस्तावित केलेले टॅरिफ पुन्हा लागू होणार आहे. हे टॅरिफ सध्याच्या टॅरिफपेक्षा २५ ते ३५ टक्क्यांनी कमी आहे आणि त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.