Lokmat Money > बिझनेस न्यूज > NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार

NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार

NPS : नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सदस्यांसाठी T+0 सेटलमेंटला परवानगी देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 02:11 PM2024-06-29T14:11:00+5:302024-06-29T14:12:13+5:30

NPS : नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सदस्यांसाठी T+0 सेटलमेंटला परवानगी देण्यात आली आहे.

Good news for NPS customers now one day settlement facility new changes will be implemented | NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार

NPS ग्राहकांसाठी खुशखबर, आता एका दिवसात सेटलमेंटची सुविधा मिळणार, नवीन बदल लागू होणार

NPS : नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राधिकरणाने नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांसाठी T+0 सेटलमेंटला परवानगी दिली आहे. या वर्षी १ जुलैपासून नवीन प्रणाली लागू होणार आहे. जर सबस्क्राइबरने कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रोसेस केली तर त्यावर त्याच दिवशी काम सुरू होईल आणि त्याला नेट ॲसेट व्हॅल्यूचा लाभ मिळेल. 

₹१० हजारांच्या गुंतवणूकीवर ₹७ लाखापर्यंतचे रिटर्न; २०२४ मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समुळे झाला 'धनलाभ'

NPS ला म्युच्युअल फंडांच्या बरोबरीने नेण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. सध्या, ट्रस्टी बँकेकडून मिळालेले पुढील सेटलमेंटच्या दिवशी इनव्हेस्ट केले जातात. आदल्या दिवशी मिळालेली इनव्हेस्टमेंट दुसऱ्या दिवशी गुंतवले जातात. PFRDA ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आता कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेले योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल. यासह, ग्राहकांना त्याच दिवशी NAV चा लाभ मिळेल. ट्रस्टी बँकेला सकाळी ११ नंतर मिळालेले योगदान पुढील सेटलमेंटच्या दिवशी गुंतवले जाईल.

नवीन प्रणाली १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. PFRDA ने सांगितले की, कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मिळालेले डि-रिमिट केलेले योगदान त्याच दिवशी गुंतवले जात आहे. नवीन प्रणालीनुसार, आता सकाळी ११ वाजेपर्यंतचे योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल.

EPS मध्ये गुंतवणुकीचा फायदा

सरकारने कर्मचारी पेन्शन योजना १९९५ मध्ये एक सुधारणा केली आहे, यामुळे ६ महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेल्या सदस्यांना देखील पैसे काढण्याचे फायदे मिळतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, सरकारने टेबल डी मध्ये देखील बदल केले आहेत, यामुळे सेवेत पूर्ण झालेले महिने लक्षात घेऊन सदस्यांना त्याच प्रमाणात पैसे काढण्याचा लाभ मिळेल. आतापर्यंत काढलेल्या लाभाची गणना सेवा पूर्ण केलेल्या वर्षांच्या संख्येवर आणि ज्या वेतनावर EPS योगदान देण्यात आली होती त्यावर केली जात होती.

Web Title: Good news for NPS customers now one day settlement facility new changes will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.