Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार १५० किलो धान्य, सरकारने केली मोठी घोषणा

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार १५० किलो धान्य, सरकारने केली मोठी घोषणा

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. कार्डधारकांना आता सरकारने १५० किले मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:10 PM2022-12-07T16:10:14+5:302022-12-07T16:12:27+5:30

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. कार्डधारकांना आता सरकारने १५० किले मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Good news for ration card holders 150 kg of grain will be free, the government made a big announcement | रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार १५० किलो धान्य, सरकारने केली मोठी घोषणा

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार १५० किलो धान्य, सरकारने केली मोठी घोषणा

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. कार्डधारकांना आता सरकारने १५० किले मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या संदर्भात घोषणा केली आहे. सरकार देशातील करोडो लोकांना मोफत रेशन देते, या योजनेचा अनेकजण फायदा घेतात. सरकार यात नेहमी बदल करत असते. आता रेशन डिजिटल पद्धतीने वाटले जाते. 

रेशन प्रत्येक महिन्याला दिले जाते, याचे वाटप कुटुंबातील संख्येवर केले जाते. आता आपल्याला रेशनमध्ये पहिल्यापेक्षा जास्त धान्य मिळणार आहे. आता गरिबांना १३० किलो ऐवजी १५० किलो पर्यंत तांदुळ मिळणार आहे. सरकारने यात मोठा बदल केला आहे. याअगोदर ज्या ग्राहकांना ३५ किलो तांदुळ मिळत होते, त्या ग्राहकांना आता १३५ किलो तांदुळ मिळणार आहे. तसेच काही ग्राहकांना १५० किलो तांदुळ मिळणार आहे. सरकारने यासाठी काही अटी घातल्या आहेत. 

सरकारने ही घोषणा छत्तीसगड येथील बीपीएल कार्डधारकांसाठी केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही छत्तीसगडचे रहिवासी असणे गरजेचे आहे. तुम्हाला ४५ किलो पासून ते १३५ किलोपर्यंत तांदुळ मिळणार आहे. 

अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणारा तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...भाई पत्ता दे मीही मदत करतो!

केंद्र सरकारकडूनही मोफत रेशन वितरण ऑक्टोबरपासून सुरू होणार होते, पण अजुनही सुरू झालेले नाही. आता सरकारकडे आपला आणि केंद्र सरकार असा दोन महिन्यांचा कोटा आहे. छत्तीसगड सरकार आता रेशनकार्ड धारकांना १५ ते १५० किलो तांदुळ मोफत देणार आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या लॉटमुळे कार्डधारकांना एकत्रित वाटप होणार आहे. 

Web Title: Good news for ration card holders 150 kg of grain will be free, the government made a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.