Join us

नोकरदार वर्गासाठी खूशखबर! आता ईपीएफवर 8.15 टक्के व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 5:28 AM

यात जमा निधीवर सरकारने ८.१५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली.  

नवी दिल्ली : एम्प्लाॅइज प्राॅव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन अर्थात ‘ईपीएफओ’चे सदस्य असलेल्या नाेकरदार वर्गाला सरकारने खूशखबर दिली आहे. यात जमा निधीवर सरकारने ८.१५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली.  

ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ राेजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला हाेता. सरकारने ताे मंजूर करीत सर्व विभागीय कार्यालयांना ८.१५% या दराने सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.१०% हाेता. १९७७-७८ या वर्षानंतरचा हा सर्वांत कमी व्याजदर हाेता.

किती व्याज मिळणार?

जुन्या आणि नव्या दराने मिळणारे व्याज उदाहरणार्थ समजून घेऊ या.जमा      ८.१०%      ८.१५% रक्कम    दर व्याज    दर व्याज₹१ लाख    ₹८,१००    ₹८,१५०₹३ लाख    ₹२४,३००    ₹२४,४५०₹५ लाख    ₹४०,५००    ₹४०,७५०

आतापर्यंतचे चढउतार

वर्ष    व्याजदर १९५२-६६    ३ ते ४.७५%१९६७-७५    ५ ते ७%१९७६-८३    ७.५० ते ८.७५%१९८४-८९    ९.२५ ते ११.८०%१९९०-९९    १२%२०००-०१    ११%२००१-०५    ९.५०%२००६-१०    ८.५० ते ९.५०%२०११-२१    ८.२५ ते ८.५०%२०२१-२२    ८.१०%२०२२-२३    ८.१५%६ काेटींपेक्षा जास्त सदस्य ईपीएफओचे देशभरात आहेत. ८.१०% व्याजदर  २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिले हाेते. १२% हा सर्वाधिक व्याजदर १९८९-२००० या काळात होता. 

टॅग्स :निधी