Join us  

अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:11 PM

भारतातील अमेरिकन दुतावासाने अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

भारतातील अमेरिकन दुतावासाने अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यातील बहुतेक लोक अभ्यासासाठी, कामासाठी किंवा प्रवासासाठी जातात. पण, कधीकधी व्हिसाची मागणी खूप जास्त होते.

यामुळे अनेकांना आपले प्लॅन रद्द करावे लागले आहेत. पण आता पर्यटक, कुशल कामगार आणि विद्यार्थ्यांसह भारतीय प्रवाशांसाठी अतिरिक्त २५०,००० व्हिसा खुल्या केल्या आहेत.

"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 

हे नवीन स्लॉट लाखो भारतीय अर्जदारांना वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास मदत करतील. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल. यामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे भारतातील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे.

यूएस दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, या उन्हाळ्यात विद्यार्थी व्हिसा हंगामादरम्यान, आम्ही भारतातील आमच्या पाच कॉन्सुलर विभागांमध्ये विक्रमी संख्येने विद्यार्थी अर्ज करू शकले. 

२०२३ मध्ये रचला नवा विक्रम 

२०२३ या वर्षामध्ये अमेरिकेच्या देशभरातील अँम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हीसा देत नवा विक्रम रचला आहे. तसेच, व्हीसाच्या प्रतीक्षा कालावधीमधील विलंब देखील कमी केल्याची माहिती अँम्बसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

यानुसार, गेल्यावर्षी अमेरिकी व्हीसाच्या सर्वच श्रेणीतील व्हीसाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या वर्षात व्हीसासाठी ६० टक्के अधिक अर्ज दाखल झाले होते. या विक्रमी व्हीसासंख्येमुळे अमेरिकेसाठी देण्यात येणाऱ्या प्रत्येक दहा व्हीसामध्ये एका भारतीय व्हीसाचा समावेश आहे. २०२३ च्या वर्षामध्ये जारी करण्यात आलेल्या व्हीसामध्ये ७ लाख लोकांना बी१-बी२ श्रेणीतील व्हीसा मंजूर करण्यात आला आहे. तर अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना व्हीसा जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :पासपोर्टव्हिसा