Join us

NPS, अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:36 IST

तुम्हीही पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक पेन्शन योजना राबविण्यात येत आहेत. तुम्हीही पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम आणि अटल पेन्शन योजनेबाबत सरकारकडून एक नवीन माहिती समोर आली आहे.

आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे दीपक मोहंती यांनी माहिती दिली. मोहंती म्हणाले की, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन योजना अंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. अटल पेन्शनचा हा आकडा २३ ऑगस्टलाच गाठला. पाच लाख कोटी रुपयांवरून दुप्पट व्हायला दोन वर्षे १० महिने लागले.

व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत, अटल पेन्शन योजनेचे २५ ऑगस्ट अखेर ३०,०५१ कोटी रुपये होते, तर NPS Lite चा आकडा ५,१५७ कोटी रुपये होता. NPS आणि अटल पेन्शनच्या लाभार्थ्यांची संख्या मिळून ६.६२ कोटींहून अधिक झाली आहे.

NPS सर्व सरकारी कर्मचार्‍यांना सशस्त्र दल वगळता लागू आहे, ज्यांना १ जानेवारी २००४ किंवा त्यानंतर केंद्र सरकारची नोकरी मिळाली आहे. बहुतेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारने त्यांच्या नवीन कर्मचाऱ्यांसाठी NPS देखील अधिसूचित केले आहेत. एनपीएस १ मे २००९ पासून प्रत्येक भारतीय नागरिकासाठी स्वेच्छेने उपलब्ध आहे. यानंतर, १ जून २०१५ रोजी एपीवाय सुरू करण्यात आला.

पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDA एक पद्धतशीर पैसे काढण्याची योजना सुरू करण्याची योजना आखत आहे, यामुळे पेन्शन खातेधारकांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार एकरकमी रक्कम काढता येईल. ते अंतिम टप्प्यात असल्याचे मोहंती यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपासून ही प्रणाली लागू होईल.

टॅग्स :निवृत्ती वेतनसरकार