Lokmat Money > बिझनेस न्यूज > अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्...

अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्...

UPI : काही वेळा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे UPI युजर्स नाराज होतात. आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 11:53 AM2022-06-05T11:53:19+5:302022-06-05T11:54:36+5:30

UPI : काही वेळा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे UPI युजर्स नाराज होतात. आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

good news for upi user payment failures will be resolved in real time soon says npci md and ceo dilip asbe | अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्...

अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्...

नवी दिल्ली - युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला डिजिटल पेमेंट मोड (Digital Payment) म्हणून उदयास आला आहे. काही वेळा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे UPI युजर्स नाराज होतात. आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्यूट रिजॉल्यूशन सिस्टम तयार करण्यावर काम करत आहे.

हिंदूबिझनेसलाइनच्या अहवालानुसार, एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे यांनी सांगितले की, ही प्रणाली सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित होईल. एपमधील फीचर्ससह सुमारे 80-90 टक्के पेमेंट फेल्युअर रिअल टाइममध्ये सोडवले जाण्याची अपेक्षा आहे. IMF-सिंगापूर प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये, आसबे म्हणाले की, आम्ही ऑनलाइन डिस्पूट रिजॉल्यूशनवर काम करत आहोत. पुढील तीन महिन्यांत, UPI इकोसिस्टममधील 80-90 टक्के डिस्प्यूट ऑनलाइन सोडवले जातील.

बँकेला कॉल करण्याची गरज नाही

पुढे ते म्हणाले की, पुढील 3 महिन्यांत ग्राहकांना बँकेत कॉल करण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज भासणार नाही, फक्त तुमच्या एपवर UPI ची मदत घ्या आणि प्रॉब्लेम रिअल टाइममध्ये सोडवला जाईल. कमीतकमी 90% UPI प्रॉब्लेम्स रिअल टाइममध्ये सोडवले जातील.

UPI म्हणजे काय?

UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे तुम्ही UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता.

कसं काम करते पैसे ट्रान्सफरची UPI सिस्टम?

हे फीचर वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Paytm, Phonepe, Google Pay, BHIM इत्यादी कोणतेही UPI एप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे बँक खाते UPI एपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI एप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI एपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात.

विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते. हजारो फीचर फोन युजर्सना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे UPI 123Pay चं नवीन व्हर्जन सादर केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: good news for upi user payment failures will be resolved in real time soon says npci md and ceo dilip asbe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक