Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा... 

आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा... 

सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहिले आहे. यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:24 PM2023-09-30T17:24:39+5:302023-09-30T17:24:52+5:30

सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहिले आहे. यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Good news from RBI! Extension of time to deposit Rs 2000 notes; View date... | आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा... 

आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा... 

दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर होती, परंतू ती आता एक आठवड्याने वाढविण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती. 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. चलनात असलेल्या ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे सांगितले जात आहे. 

सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहिले आहे. यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सव, ईद, आठवडा सुटी आणि नंतर गांधी जयंती यामुळे बँकांना मोठा सुटी होती. बरेचजण अखेरच्या दिवसांत जागे होत असल्याने बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता होती. यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. 

आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी उरलेल्या २४ हजार कोटी रुपयांपैकी किती नोटा परत येतात हा एक प्रश्नच आहे. शेवटचा आकडा ७ ऑक्टोबरनंतर समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर उरलेल्या हजारो करोडोंच्या नोटांचा काय झाले हा देखील मोठा प्रश्न यंत्रणांसमोर राहणार आहे. 

Web Title: Good news from RBI! Extension of time to deposit Rs 2000 notes; View date...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.