Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!

खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!

वर्ष २०२४ च्या पहिल्या ३ महिन्यांत चीनचा विकास दर ५.३ टक्के राहिला. भारताच्या तुलनेत तो खूपच कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:19 AM2024-06-01T07:19:22+5:302024-06-01T07:23:24+5:30

वर्ष २०२४ च्या पहिल्या ३ महिन्यांत चीनचा विकास दर ५.३ टक्के राहिला. भारताच्या तुलनेत तो खूपच कमी आहे.

Good news GDP grew by 8.2 percent; India's rate is the highest in the world! | खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!

खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था मार्चच्या तिमाहीत ७.८ टक्के दराने वाढली असून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपी वाढीचा दर ८.२ टक्के असेल, असे भारत सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे. जानेवारी-मार्च तिमाहीतील भारताचा विकास दर डिसेंबर तिमाहीतील ८.६ टक्क्यांच्या तुलनेत थोडा कमी राहिला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थव्यवस्था ८.२ टक्के दराने वाढली. २०२२-२३ मध्ये हा दर ७ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) विकास दर ६.२ टक्के होता.

अशी झाली वाढ...

  • २०१८-१९        ६.५
  • २०१९-२०        ३.९
  • २०२०-२१        -५.८
  • २०२१-२२        ९.७
  • २०२२-२३        ७.०
  • २०२३-२४        ८.२


जगात वेगवान वाढ

  • दुसऱ्या अंदाजात एनएसओने आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वृद्धी दर ७.७ टक्के अनुमानित केला होता. त्यापेक्षा जास्त वेगाने भारताची अर्थव्यवस्था वाढली आहे. जगात सर्वाधिक वाढीचा हा दर आहे.
  • वर्ष २०२४ च्या पहिल्या ३ महिन्यांत चीनचा विकास दर ५.३ टक्के राहिला. भारताच्या तुलनेत तो खूपच कमी आहे.

Web Title: Good news GDP grew by 8.2 percent; India's rate is the highest in the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.