Join us

खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 6:04 PM

आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे.

सोने आणि चांदीच्या दरात या वर्षी मोठी घसरण झाली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजीच्या बंद भावाच्या तुलनेत सोने 856 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या किंमतीतही 2167 रुपये प्रति किलोची घसरण नोंदवली गेली आहे. आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे.

सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62390 रुपयांवर बंद झाला, तर चांदी 71228 रुपयांवर. 23 कॅरेट गोल्डच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, हे 62140 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 57149 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे 18 कॅरेट सोन्याचा भाव 46793 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 36498 रुपयांवर होता.

चांदी 5845 रुपयांनी स्वस्त - 4 डिसेंबर 2023 रोजी 24 कॅरेट सोने 63805 रुपयांवर खुले होऊन 63281 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 77073 रुपये प्रति किलो दराने खुली होऊन 76430 रुपयांवर बंद झाली होती. 4 डिसेंबरच्या खुल्या किंमतीच्या तुलनेत आता सोने 1415 रुपये तर चांदी 5845 रुपये स्वस्त आहे.

सोने आणि चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केले आहेत. आयबीजेएच्या दरानुसार, दिल्ली, मुंबई, गोरखपूर, लखनऊ, जयपूर, इंदूर पाटणासह सोन्या-चांदीच्या सरासरी दरात घट झाली आहे. या रेटवर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लागलेला नाही. आपल्या शरहात हे भाव काही प्रणात कमी अधिक असू शकतात.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायबाजार