Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुडन्युज! सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; देशभर एकाच दरात मिळेल सोने

गुडन्युज! सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; देशभर एकाच दरात मिळेल सोने

आता वन नेशन वन गोल्ड रेट, बुलियन एक्स्चेंजचा होणार असा लाभ.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:13 AM2022-08-02T07:13:31+5:302022-08-02T07:14:14+5:30

आता वन नेशन वन गोल्ड रेट, बुलियन एक्स्चेंजचा होणार असा लाभ.

Good news Golden opportunity for gold buyers Gold will be available at the same rate all over the country one nation one gold rate price today | गुडन्युज! सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; देशभर एकाच दरात मिळेल सोने

गुडन्युज! सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; देशभर एकाच दरात मिळेल सोने

दोन दिवसांपूर्वी गुजरामधील गांधीनगरमध्ये सुरू केलेल्या बुलियन एक्सचेंजमुळे संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित करण्यात मदत होईल. ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’, योजना लागू करणे त्यामुळे शक्य होणार आहे.

सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा भाव विभिन्न असतो. मात्र, सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरविले जाते, तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यांत पाठविले जाते. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो. ही परिस्थिती बुलियन एक्स्चेंजमुळे बदलणार आहे.

कोणता खर्च वाचणार?
बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यात वाहतुकीचा खर्च वाचेल. असल्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल. याबाबत ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, वाहतूक खर्चास फाटा मिळाल्यामुळे सोने स्वस्तात मिळेल.

ग्राहकांना फायदा
भविष्यात सोन्याचा भाव वाढला नाही, तर स्वस्त दराचा फायदा ग्राहकांना मिळू शकेल. बुलियन एक्सचेंजमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील. त्याचा लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना फायदा होईल.

Web Title: Good news Golden opportunity for gold buyers Gold will be available at the same rate all over the country one nation one gold rate price today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.