Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर खरेदीदारांसाठी खूशखबर! 'या' ठिकाणी मिळतंय 'ऑल टाइम लो रेट'वर लोन, वाचा सविस्तर...

घर खरेदीदारांसाठी खूशखबर! 'या' ठिकाणी मिळतंय 'ऑल टाइम लो रेट'वर लोन, वाचा सविस्तर...

LIC Housing Finance : गृह कर्ज (Housing loan) देणारी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Ltd) एक मोठी घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 09:45 AM2021-07-03T09:45:01+5:302021-07-03T09:45:45+5:30

LIC Housing Finance : गृह कर्ज (Housing loan) देणारी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Ltd) एक मोठी घोषणा केली आहे.

good news for home buyers lic hfl slashes home loan rates to all time low check details | घर खरेदीदारांसाठी खूशखबर! 'या' ठिकाणी मिळतंय 'ऑल टाइम लो रेट'वर लोन, वाचा सविस्तर...

घर खरेदीदारांसाठी खूशखबर! 'या' ठिकाणी मिळतंय 'ऑल टाइम लो रेट'वर लोन, वाचा सविस्तर...

नवी दिल्ली : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गृह कर्ज (Housing loan) देणारी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Ltd) एक मोठी घोषणा केली आहे. गृह कर्जाचे व्याज दर कमी करून 6.66 टक्के केल्याचे कंपनीने म्हटले आहे. (good news for home buyers lic hfl slashes home loan rates to all time low )

एलआयसी हाऊसिंग फायनान्सने 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याज दरात (Home loan rates) घट करून ऑल टाइम लो (All time low interest rate) केले आहे. मात्र, ग्राहक याचा मर्यादित कालावधीसाठी लाभ घेऊ शकता. एलआयसी एचएफएलच्या (LIC HFL) निवेदनानुसार, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडची ही योजना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असणार आहे. अटीनुसार, कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी भरावा लागेल.

जाणून घ्या, कंपनी काय म्हणते?
कंपनीने म्हटले आहे की, 6.66 टक्क्यांवर एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने 30 वर्षांच्या जास्तीत जास्त मुदतीसह गृहकर्जांवरील सर्वात कमी व्याज दर जाहीर केले आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वाई विश्वनाथ गौर यांनी सांगितले की, कोरोना संकट काळात आम्हाला असे दर जाहीर करायचे होते, ज्यामुळे अधिकाधिक लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकतील. तसेच, आम्हाला आशा आहे की दरांमध्ये कपात केल्याने ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल.

घर बसल्या कर्जासाठी अर्ज
कंपनीद्वारे लाँच करण्यात आलेले होमवाय अॅप (HomY app) डिजिटल पद्धतीने अर्ज करण्याची आणि ऑनलाईन मान्यता मिळण्याची सुविधा प्रदान करते. तसेच ग्राहक एलआयसी एचएफएल कार्यालयांना भेट न देता त्यांच्या कर्जाच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकतात. होमवाय अॅपचा लाभ घेऊन आपल्या ग्राहकांना डोर-टू-डोर सेवा एलआयसी एचएफएल प्रदान करते.

Web Title: good news for home buyers lic hfl slashes home loan rates to all time low check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.