नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. छोट्या बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एनएससी ( NSC), पोस्ट ऑफिसमधील (Post Office) मुदत ठेवी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पीपीएफ ( PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनाच्या ( Sukanya Samridhi Yojana) व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
किसान विकास पत्र (KIsan Vikas Patra), पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना (Post Office Deposit Schemes) एनएससी ( NSC) आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना ( Senior Citizen Saving Schemes) यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वित्त मंत्रालयाने ( Finance Ministry) 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्चपर्यंत वरील बचत योजनाच्या व्याजदरात वाढ केली आहे. दरम्यान, पीपीएफ ( PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनाच्या ( Sukanya Samridhi Yojana) व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Govt hikes interest rates on NSC, post office term deposits, senior citizen savings scheme from January 1; no change in PPF rate: Order
— Press Trust of India (@PTI_News) December 30, 2022
पीपीएफ, सुकन्या योजनेवर व्याजदर वाढले नाहीत
वित्त मंत्रालयाने जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफ (PPF) वर 7.1 टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत राहील. पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 5.80 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.
रेपो दरवाढीनंतर व्याजदर वाढले
आरबीआयने सलग पाच वेळा पतधोरण बैठकीनंतर पॉलिसी रेट रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. 8 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये रेपो रेट 4 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे.