Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! पॅन कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार लिंक

खूशखबर! पॅन कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार लिंक

पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 09:25 PM2019-03-31T21:25:10+5:302019-03-31T21:44:23+5:30

पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

Good news! Increase in link time for linking PAN card, link up to 'this' date | खूशखबर! पॅन कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार लिंक

खूशखबर! पॅन कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार लिंक

नवी दिल्ली- पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पॅनला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती सीबीडीटी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्च 2019पर्यंत पॅन कार्डआधार कार्डला लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं वाढवली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2019पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे. परंतु तरीही 1 एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे. 


सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ‘आधार’सक्तीच्या मुदतीत वाढ करण्याचे निर्देश केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी)जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आयकर भरताना आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे असेल. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९अअ हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले आहे. बोगस कागदपत्राच्या आधारे पॅन कार्ड तयार केली जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं हा तोडगा काढला. त्यासाठीच आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.

Web Title: Good news! Increase in link time for linking PAN card, link up to 'this' date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.