नवी दिल्ली : जगातील मंदीच्या सावटापासून भारत मोठ्या प्रमाणात दूर आहे. सध्याचा नोकरभरतीचा कल पाहता, येणाऱ्या काही वर्षांत भारतातील रोजगार वृद्धी मजबूत राहण्याची शक्यता असल्याचे मत व्यवसाय सेवा दाता संस्था ‘क्वेस कॉर्प’चे संस्थापक तथा बिगर-कार्यकारी अध्यक्ष अजित आयझॅक यांनी केले आहे. बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अजित आयझॅक यांनी सांगितले की, जगभरात मंदीची शक्यता व्यक्त होत आहे. काेराेना आणि युक्रेन युद्धामुळे जगावर मंदीचे सावट आहे. असे असतानाही भारत उत्तमरीत्या काम करीत आहे. भारतात मंदीची भीती कमी दिसते.
आर्थिक वृद्धी कायमn सध्या भारताचा वृद्धिदर ८%पेक्षा कमी असला तरी वृद्धी कायम असल्याचे दिसून येत आहे. २००० ते २००७ या कालावधीत भारतात उत्तम रोजगार वृद्धी पाहायला मिळाली.n सध्याचा कल कायम राहिल्यास या कामगिरीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होऊ शकते, असे आयझॅक म्हणाले.