Join us

आनंदाची बातमी! जागतिक मंदीच्या वादळातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 9:18 AM

जागतिक बँकेने जीडीपी वृद्धीच्या अंदाजात केली वाढ, अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत 

नवी दिल्ली -  "बिघडत्या बाह्य घटकांच्या स्थितीतही भारताच्या वित्त वर्ष २०२२-२३ च्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात अर्थात जीडीपीमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये भारताचा जीडीपी वृद्धिदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज ऑक्टोबरमध्ये व्यक्त करण्यात आला होता. जागतिक बँकेने आता तो वाढवून ६.९ टक्के केला आहे.

काही रेटिंग एजंसींनी भारताच्या जीडपी विकासदरात घट केली होती. मात्र, जागतिक बँकेने देशाच्या आर्थिक स्थितीबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. वित्त वर्ष २०२१-२२ मधील ८.७ टक्के वृद्धीच्या तुलनेत मात्र हा अंदाज अजूनही खूप कमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ७ टक्के जीडीपी विकासदर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत 'नेव्हिगेटिंग द स्टॉर्म' या शीर्षकाखाली बँकेने अहवाल सादर केला आहे. त्यात म्हणले आहे, की जागतिक पातळीवर परिस्थिती खराब आहे. त्याचा भारतीय आर्थिक विकासावर परिणाम होईल. मात्र, इतरांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था हे सांभाळण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे.

महागाई नियंत्रणात येईलमहागाई नियंत्रणात आरबीआयनेही व्याजदरात वाढ केली आहे. त्य चीनमधील परिस्थितीमुळेही वृद्धिदर घसरत आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ६.४ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष केंद्र सरकार साध्य करेल तसेच महागाईचा दर ७.१% वर येईल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ६.४ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष केंद्र सरकार साध्य करेल तसेच किरकोळ महागाईचा दर ७.१ टक्क्यांवर येईल, असा अंदाज आहे. जागतिक परिस्थिती खराब असुनही भारतीय अर्थव्यवस्था लढवैय्याप्रमाणे क्षमता दाखवित आहे. आर्थिक पाया मजबूत असल्यामुळे इतरांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. - तानो कुआमे, भारतातील संचालक, जागतिक बँक

आव्हानांचा सक्षमपणे करणार सामनाजागतिक अर्थव्यवस्थादेखील काहीशी सुस्त आहे, महागाईदेखील वाढलेलीच आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ८.७ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी भारताचा आर्थिक विकास दर कमीच राहू शकतो. तरीही या सर्व आव्हानांचा सक्षमपणे सामना करुन भारत मजबूत विकास दर साधणार असून जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरेल, असे अहवालात म्हटले आहे.

भारतावर परिणाम केवळ ०.४ टक्केचअमेरिकेतील विकासदरात १ टक्के कपात झाली तर इतर देशांवर त्याचा दिडपट परिणाम होतो. मात्र, भारतावर केवळ ०.४ टक्के परिणाम होत असल्याचे निरिक्षण जागतिक बँकेने नोंदविले आहे.

रुपया मजबूतचडॉलरच्या तुलनेत रुपयाचे चलनीमूल्य मोठ्या प्रमाणावर घटले आहे. मात्र, ही घट यावर्षी केवळ १० टक्केच आहे. इतर विकसनशील चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत आहे. त्यातून भारतीय अर्थव्यस्थेची बळबटी दिसून येते, असे मत जागतिक बँकेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी व्यक्त केले.

काय आहे जीडीपी ?देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या एकत्रित मूल्यास सकल राष्ट्रीय उत्पन्न अथवा जीडीपी म्हटले जाते. जीडीपीमधून आर्थिक घडामोडींचा स्तर कळतो. कोणत्या क्षेत्रात तेजी अथवा घसरण आली हे त्यातून कळते. भारत सरकारचे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय जीडीपीचे मूल्यांकन करते

टॅग्स :अर्थव्यवस्था