Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:04 PM2023-11-08T15:04:11+5:302023-11-08T15:06:49+5:30

कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

Good news LPG customers will get cheap gas cylinders Modi government plans to boost cooking gas subsidy | खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

देशात आगामी मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यापूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सब्‍सिडी वाढविण्यावर व‍िचार करण्यात येत आहे. सरकारकडून ही सब्‍स‍िडी प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजनेतील (PMUY) लाभार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

ग्राहकसंख्या वाढवण्यावरही भर -
उज्ज्वला योजनेचा लाभ अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावरही सरकार भर देत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर घसरून 5.02 टक्क्यांवर आला आहे. सरकारने आरबीआयला (RBI) महागाई दर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे लक्ष दिले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात महागाई दर 15 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

एलपीजी स‍िलिंडरची किंमत 903 रुपये -
सध्या उज्‍ज्‍वला योजनेतील लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरवर 300 रुपये प्रत‍ि स‍िलिंडर दराने सब्‍स‍िडी मिळते. दिल्लीत 14.2 क‍िलोच्या एलपीजी स‍िलिंडरची किंमत 903 रुपये एवढी आहे. मात्र ही सब्‍स‍िडी मिळाल्यानंतर, लाभार्थ्यांना हे सिलिंडर 603 रुपयांना मिळते. केंद्रीय मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी जवळपास 9.6 कोटी एवढे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस सब्‍स‍िडीवर दिलासा दिला होता. यानंत, या कुटुंबांसाठी स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी 200 रुपयांची सब्सिडी 300 रुपये प्रत‍ि सिलिंडर झाली होती. सरकारकडून हा निर्णय पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला होता. 

Web Title: Good news LPG customers will get cheap gas cylinders Modi government plans to boost cooking gas subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.