Join us  

खुशखबर! महानगर गॅसकडून CNG च्या किमतीत 8, तर PNG च्या किंमतीत 5 रुपयांची कपात; जाणून घ्या मुंबईतील लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 10:58 PM

नवे दर आज मध्यरात्रीपासून अथवा 8 एप्रिलपासून लागू होतील. सध्या मुंबईमध्ये सीएनजी गॅसचा भाव 87 रुपये प्रति किलो तर पीएनजी गॅसचा दर 54 रुपए प्रति युनिट एवढा आहे.

सीएनजी (CNG Price) आणि पीएनजी (PNG Price) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून नॅच्युरल गॅसच्या किंमती निश्चित होताच महानगर गॅस लिमिटेड नेही मोठा निर्णय घेतला आहे. MGL ने CNG आणि PNG च्या दरात कपातीची घोषणा केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी गॅसची किंमत 8 रुपयांनी कमी करून 79 रुपये प्रति किलोग्रॅम केली आहे. तर पीएनजी गॅसची  किंमत 5 रुपयांनी कमी करून 49 रुपये प्रति युनिट केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून अथवा 8 एप्रिलपासून लागू होतील. सध्या मुंबईमध्ये सीएनजी गॅसचा भाव 87 रुपये प्रति किलो तर पीएनजी गॅसचा दर 54 रुपए प्रति युनिट एवढा आहे.

फेब्रुवारी महिन्यातही केली होती कपात -यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडने फेब्रुवारी महिन्यातही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. यावेळी सीएनजीच्या दरात (CNG Price ) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.

पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 49 टक्क्यांनी स्वस्त -  पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत आता सीएनजी आणि पीएनजी हे दोन्हीही स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत 49 टक्के तर डिझेलच्या तुलनेत 16 टक्क्यांनी स्वस्त आहे. तर, एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचा दर हा 21 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. 

केंद्र सरकारकडून जाहीर झालेले सीएनजीचे दर असे -पारेख समितीच्या शिफारशीनुसार आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सीएनजी गॅसचे दर जाहीर केले. एप्रिल महिन्यासाठी 7.92 डॉलर प्रति MMBtu इतकी निश्चित करण्यात  आली आहे. ग्राहकांसाठी हा दर 6.5 डॉलर एवढा असेल. 

टॅग्स :मुंबईपेट्रोलडिझेल