Join us

आनंदाची बातमी! आता दुकानदारांनाही मिळणार दर महिना 3000 रुपये पेन्शन; झटपट करा रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 3:53 PM

या योजनेंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित राहील.

या लोकांना पेन्शन मिळेलया पेन्शन योजनेंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

अटी काय असतीलयामध्ये नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

अशा प्रकारे पेन्शनसाठी नोंदणी केली जाईल18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शन योजनेत सामील होणारे लोक देशभरात पसरलेल्या 3.25 लाख सामान्य सेवा केंद्रांवर नोंदणी करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपा नियम करण्यात आला आहे. यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक असेल.

मृत्यूनंतर, नॉमिनीला पेन्शनचा लाभ मिळेलयोजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही Labor.gov.in आणि maandhan.in वर लॉग इन करू शकता.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक