Join us

गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 5:56 PM

सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल

ठळक मुद्देसूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल

नवी दिल्ली : गृहकर्ज घेण्यासाठी आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. जवळच्या पोस्ट ऑफिसातूनही तुम्ही स्वस्त गृहकर्ज घेऊ शकाल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) एलआयसी हाऊसिंग फायनान्ससोबत (एलआयसी एचएफएल) भागिदारी केली असून, आयपीपीबीच्या ४.५ कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.

सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल. या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा ६.६६ टक्के असेल. या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत, अशा भागात स्वस्त गृहकर्जाची  सुविधा या भागिदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे. विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काही पहिलीच वेळ नाही. 

 दोन लाख कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्कदोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी करून या भागिदारीची माहिती दिली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आयपीपीबीकडे २ लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करते. हेच कर्मचारी गृहकर्जाच्या वितरणात महत्त्वाची भूमिका निभावतील.

टॅग्स :घरपोस्ट ऑफिसबँक