Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी 

खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी 

SBI : सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून 'ऑनलाइन' अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:29 AM2021-08-29T11:29:11+5:302021-08-29T11:30:07+5:30

SBI : सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून 'ऑनलाइन' अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Good news! Opportunity to buy cheap gold from SBI from tomorrow | खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी 

खूशखबर! उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी 

नवी दिल्ली : जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने (SBI)एक चांगली संधी आणली आहे. बँक ३० ऑगस्टपासून डिजिटल गोल्ड (Sovereign Gold Bonds) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देत आहे, ही गुंतवणूक ३ सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे. या बाँडसाठी अर्ज करण्यासाटी पाच दिवस असणार आहेत. 

दरम्यान, भारतीय रिर्झव्ह बँकेने (RBI) शुक्रवारी सांगितले की, सरकारी गोल्ड बाँडच्या पुढील हप्त्यांसाठी किंमत प्रति ग्रॅम ४,७३२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी ३० ऑगस्टपासून पाच दिवस बाँड उघडेल. सरकारी सुवर्ण योजना २०२१-२२ ही मालिका ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सहा वर्गणींसाठी सुरू होईल.

या लोकांना मिळेल सूट
सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून 'ऑनलाइन' अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की, गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,७३२ रुपये आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,६८२ रुपये असेल.

यापूर्वी सरकारने मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत सहा हप्त्यांमध्ये सरकारी गोल्ड बाँड जारी करण्याची घोषणा केली होती. आरबीआय भारत सरकारच्यावतीने बाँड जारी करते. या बाँडची विक्री बँकांद्वारे (छोट्या वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), नियुक्त पोस्ट कार्यालये आणि मान्यताप्राप्त शेअर मार्केट नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसईच्या माध्यामातून केली जाते.
 

Web Title: Good news! Opportunity to buy cheap gold from SBI from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.